सांगली: सद्भावना एकता रॅलीत भोवळ येऊन मृत्यू झालेल्या ऐश्वर्या शाशिकांत कांबळे या 14 वर्षीय मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन इन कॅमेरा झालं. या अहवालात आतड्याला रक्तपुरवठा कमी झाल्याने ऐश्वर्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सांगलीत काल सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सद्भावना एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
या रॅलीत जिल्ह्यातील नागरिकांसह शाळकरी मुलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता. रॅलीमध्ये ग. रा. पुरोहित कन्या शाळेची विद्यार्थिनी ऐश्वर्या कांबळे ही देखील सहभागी झाली होती. रॅलीची सांगता झाल्यानंतर ती घराकडे परतत होती. पण विठ्ठल मंदिरसमोर तिला भोवळ येऊन, ती बेशुद्ध झाली.
एकतेच्या मोठ्या आवाजाने समाजकंटकांच्या कानठळ्या बसतील : विश्वास नांगरे-पाटील
ऐश्वर्यला चक्कर आल्याने तिला शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, पण अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.
दरम्यन ऐश्वर्या गेल्या दोन दिवसापासून आजारी होती. तिला ताप आणि उलट्यांचा त्रास सुरु होता. वडिलांनी तिला शाळेला तसेच एकता रॅलीत जाऊ नकोस, असे सांगितले होते. पण तरीही ती रॅलीत सहभागी झाली होती. पण रॅली संपवून घरी जाताना तिला चक्कर आली आणि तिचा मृत्यू झाला.
दरम्यान या घटनेनंतर जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी रुग्णालयास भेट दिली. नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन करत ऐश्वर्याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटलं.
संबंधित बातम्या
एकतेच्या मोठ्या आवाजाने समाजकंटकांच्या कानठळ्या बसतील : विश्वास नांगरे-पाटील
सांगलीत सद्भावना रॅलीदरम्यान 14 वर्षीय मुलीचा भोवळ येऊन मृत्यू