सांगली: सांगली महापालिका निवडणुकीसाठी मतदाला सकाळी साडे सात वाजता सुरुवात झाली. सकाळी साडेनऊपर्यंत सरासरी 10 टक्के मतदान झालं. यंदा प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीचा घोषवारा लावण्यात आला आहे.


निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ज्या प्रभागात जे उमेदवार उभे आहेत, त्या सर्व उमेदवारांची माहिती मतदारांना दिली. या बोर्डमध्ये उमेदवाराचे नाव, त्याचं शिक्षण, एकूण संपत्ती, उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. या बोर्डवरील ही सर्व माहिती वाचून काही मतदार मतदान करण्यास जात असल्याचे चित्र मतदान केंद्रावर पाहायला मिळतेय.

सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची वेळ आहे. आजच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रांचं काल दुपारी वाटप करण्यात आलं होतं. सांगलीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी आहे,तर भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहे.

शुक्रवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

सांगली- मिरज- कुपवाड महापालिका 2018 

एकूण प्रभाग - 20
जागा - 78
उमेदवार - 451
मतदार - 4 लाख 24 हजार 179
मतदान केंद्रे - 544

सांगली - 78 जागांसाठी 451 उमेदवार रिंगणात

काँग्रेस – 44, राष्ट्रवादी - 34, भाजप - 78, शिवसेना - 56, अपक्ष विकास महाआघाडी - 43, स्वाभिमानी विकास आघाडी - 20, सांगली जिल्हा सुधार समिती - 21, एमआयएम - 8

संबंधित बातम्या  

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेसाठी मतदान 

सांगली महापालिकेसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय?  


ईव्हीएम गुजरातहून सांगलीत, खोटा मेसेज पसरवणाऱ्यावर गुन्हा