Sangli Miraj Crime : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील (Sangli Miraj News Updates) शिपूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उसाच्या शेतात छापा टाकून तेथे लागवड केलेला तब्बल एक टन ओला गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत एक कोटी पाच लाख 92 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी शेत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. शिपूर येथे नंदकुमार दिनकर बाबर याच्या तीस गुंठे उसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.
त्यानुसार विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उसाच्या शेतात छापा टाकला. शेतात लावलेली एक कोटी पाच लाख ९२ हजार रुपये किमतीची ४८६ गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या गांजाचे वजन 1059 किलो आहे. यावेळी उसाच्या शेतात मोठ्या प्रमाणावर गांजा लागवड केल्याचे आढळले. उसातील गांजाची झाडे शोधून काढण्यात आली.शेतातील गांजाची झाडे तोडून पंचनामा करून वजन करण्याचे काम दिवसभर सुरू होते. नंदकुमार बाबर या शेतकऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. गांजाची लागवड उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्तीच्या कारवाईची जिल्हाभर चर्चा रंगली आहे. शिपूर गावी उसाच्या फडात हा गांजा लावला होता. या तीस गुंठे क्षेत्र असलेल्या उसाच्या पिकातून लाखो रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून संबंधित शेतकर्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
शिपूर ते खंडेराजुरी मार्गावरील म्हैसाळ योजनेच्या शाखा कालव्यानजीक गांजाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीनुसार मिरज ग्रामीण पोलीसांच्या मदतीने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक संध्या देशमुख यांनी छापा टाकला असता गांजा लागवड आढळून आली.
उसाच्या फडामध्ये चार ते पाच फुटावर गांजाची झाडे लावण्यात आली होती. पाउण एकराच्या रानात चार ते सहा फूट उंच वाढलेली साडेचारशेहून अधिक गांजाची झाले पथकाने जप्त केली. तब्बल एक टन ओला गांजा जप्त केला असून या गांजाची किंमत एक कोटी पाच लाख 92 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी शेतकरी नंदकुमार दिनकर बाबर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या