Central Railway Megablock : मुंबई (Mumbai) विभागातील मध्य रेल्वेच्या काही मार्गांवर रविवारी 28 ऑगस्ट 2022 रोजी देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे रेल्वे सेवा काही तासांसाठी बंद राहणार आहेत. रविवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे अधिकाऱ्यांनी केली आहे. या वेळेत रेल्वे वाहतूक बंद राहील. हा मेगा ब्लॉक ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी चालवला जाईल.


रविवारी 'या' रेल्वे सेवा बंद राहणार
-वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेलहून ठाण्यासाठी सुटणाऱ्या सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 या वेळेत अप मार्गावरील सेवा बंद राहतील.


-तर सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


-सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगावला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


 







मेगा ब्लॉक दरम्यान विशेष सेवा
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मेगाब्लॉक दरम्यान पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील, असे इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना 28.08.2022 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. कारण मेन लाईनवर कोणतीही ट्रेन सेवा स्थगित केली जाणार नाही.


इतर महत्वाच्या बातम्या


Mumbai Traffic Police : चिंतामणी गणपतीच्या आगमनासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग


Kerala High Court : राज्यातील अवैध धार्मिक स्थळे बंद करा, उच्च न्यायालयाचे आदेश; काय म्हटले कोर्टाने..