सांगली : आटपाडीतील प्रसिद्ध 16 लाख रुपये किमतीच्या बकऱ्यांच्या चोरीचा छडा लागला असून चोरी करणाऱ्या तीन आरोपी पोलिसांनी अटक केली आहे. बकरा परत मिळाल्यामुळे आणि चोरी उजेडात आल्यामुळे आनंदित झालेल्या मेंढपाळांनी आटपाडी पोलिसांचा गौरव केला. गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आटपाडी शहरातून बकऱ्याची वाजत गाजत बकऱ्यांची मिरवणूक काढली. त्यामुळे या बकऱ्यांची चोरी आणि चोर सापडणे हा सध्या चर्चेचा विषय ठरला होता.
आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील प्रसिद्ध असणाऱ्या मोदी बकऱ्याची किंमत दीड कोटी लागली होती. चर्चेचा विषय ठरलेल्या मोदी बकऱ्याचे वंश असणाऱ्या आटपाडीच्या सोमनाथ जाधव यांच्या अवघ्या सहा महिन्याच्या बकऱ्याला तब्बल 16 लाख इतका दर आला होता. उच्चांकी दरामुळे मोदी बकरा आणि त्याचे पिल्लू हे महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात प्रसिद्ध झाले.आणि सोमनाथ जाधव यांचा 16 लाख रुपयांचा हा बकरा आलिशान चारचाकी वाहनातून चोरून नेण्यात आला होता.या घटनेने आटपाडी शहरासह तालुक्यात खळबळ उडाली होती.
सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबुराव मेटकरी यांचा मोदी नावाचा प्रसिद्ध बकरा दीड कोटी रुपयांचा आहे. त्याला आटपाडीच्या बाजारात 70 लाख रुपये इतका प्रचंड दराने मागणी झाली. पण तो त्यांनी विकला नाही. याच दीड कोटी किमतीचे बीज असलेले आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या अवघ्या सहा महिन्याच्या बकऱ्याला तब्बल 16 लाख इतका दर आला होता. जाधव यांनी हे पिल्लू मेटकरी यांच्याकडून दोन लाखाला खरेदी केलं होतं.
संबंधित बातम्या :