सांगली : आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेल्या 16 लाखाचा बकरा चर्चेचा विषय ठरला होता. याच सोळा लाख रुपये किंमत असलेल्या बकऱ्याची शनिवारी पहाटे चोरी झाली असून आलिशान चारचाकी गाडीतून हा बकरा लंपास करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.


सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबुराव मेटकरी यांचा मोदी नावाचा प्रसिद्ध बकरा दीड कोटी रुपयांचा आहे. त्याला आटपाडीच्या बाजारात 70 लाख रुपये इतका प्रचंड दराने मागणी झाली. पण तो त्यांनी विकला नाही. याच दीड कोटी किमतीचे बीज असलेले आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या अवघ्या सहा महिन्याच्या बकऱ्याला तब्बल 16 लाख इतका दर आला होता. उच्चांकी दरामुळे मोदी बकरा आणि त्याचे पिल्लू हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात प्रसिद्ध झाले. यातील सोमनाथ जाधव यांचा 16 लाख रुपयांचा बकरा शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलिशान चारचाकी वाहनातून चोरून देण्यात आला. या घटनेने आटपाडी शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. जाधव यांनी हे पिल्लू मेटकरी यांच्याकडून दोन लाखाला खरेदी केलं होतं.


आटपाडीत जनावरांच्या बाजारात आला तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा!


जनावरांच्या बाजारासाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या आटपाडीच्या बाजारात कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने बाजार भरतो. मागे या बाजारात सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील मेंढपाळ बाबुराव मेटकरी यांचा तब्बल दीड कोटी किंमतीचा बकरा दाखल झाला होता. या बकऱ्याला बाजारात त्यांनी दीड कोटी बोली लावली होती आणि यावेळी 70 लाखांपर्यंत या बकऱ्याला मागणी झाली. मात्र मेटकरी यांनी दीड कोटी शिवाय बकरा विक्री करणारा नसल्याचा निर्णय घेतल्याने हा दीड कोटींचा बकरा विकू शकला नाही.


'पळा पळा बोकड आला!' कोल्हापुरातल्या गावात बोकडाची दहशत, गावात सूचनेचा बोर्ड


महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. आटपाडीत पशुपालक, मेंढपाळ मोठ्या संख्येने येत असतात. चालू वर्षी मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द झाली.


Special Report | 'मोदी' नावाच्या बोकडावर 70 लाखांची बोली, तरीही मालकाने विकला नाही