पलूस तालुक्याच्या ब्रह्मनाळ गावातील कृष्णा नदीच्या पात्रात शुक्रवारी (20 एप्रिल) संध्याकाळी सहाच्या सुमारास काही मुलं पोहत असताना, अचानक एका मगरीने सागर डंक नावाच्या मुलावर हल्ला करत त्याला पाण्यात ओढून नेलं.
सागर हा मूळचा बेळगाव इथला असून तो आपल्या मामाच्या गावी सध्या आला होता. मगरीच्या हल्ल्यानंतर आरडाओरडा सुरु झाल्याने ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेतली. परंतु तोपर्यंत मगर त्याला पाण्यात घेऊन गेली होती.
कृष्णा नदी पात्रात मगरीने 14 वर्षाच्या मुलाला ओढलं
शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरु होती, पण त्यात यश आलं नाही. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटेपासून पुन्हा सांगलीतील कृष्णा बोट क्लबच्या मदतीने शोध सुरु केला आहे.
दरम्यान, ब्रह्मनाळ गावातील नागरिकांनी सकाळपासून नदीकाठी मोठी गर्दी केली आहे.
पाहा व्हिडीओ