सांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने ओढलेल्या मुलाचा मृतदेह तब्बल 40 तासांनी शोधण्यात यश आलं आहे. वन विभाग आणि बोट क्लबच्या वतीने सागर डंक या 14 वर्षीय मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरु होता. अखेर तुंग पात्रात सागरचा मृतदेह सापडला.


पलूस तालुक्याच्या ब्रह्मनाळ गावातील कृष्णा नदीच्या पात्रात शुक्रवारी (20 एप्रिल) संध्याकाळी सहाच्या सुमारास काही मुलं पोहत असताना, अचानक एका मगरीने सागर डंक नावाच्या मुलावर हल्ला करत त्याला पाण्यात ओढून नेलं.

सागर हा मूळचा बेळगाव इथला असून तो आपल्या मामाच्या गावी सध्या आला होता. मगरीच्या हल्ल्यानंतर आरडाओरडा सुरु झाल्याने ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेतली. परंतु तोपर्यंत मगर त्याला पाण्यात घेऊन गेली होती.