बीड : बीड नगर परिषदेत चुलत्या विरुद्ध पुतण्याचा संघर्ष दिवसेंदिवस टोकाला पोहोचत चालाला आहे. संदीप क्षीरसागर यांनी आपले चुलते बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे.

‘निकृष्ट कामाचे उदाहरण म्हणजे बीडचे भूषण’ अशा प्रकारचे बॅनर लावून नगर परिषदेने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामची पोल खोल केली आहे.  विशेष म्हणजे ज्या कंत्राटदारांनी हे काम केले आहे ते अंदाज पत्रकाप्रमाणे केले नसल्याची जनजागृती सुद्धा या बॅनरच्या माध्यमातून केली आहे.

सारडा कंट्रक्शन या कॉन्टॅक्टरने ही सगळी कामे केली आहेत. हनुमान ठाणा ते लोणार पुरा चौक या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच हे काम अंदाज पत्रकाप्रमाणे झाला नसल्याचा दावा केला आहे. मात्र नंतर कंत्राटदाराने पुन्हा त्या ठिकाणी नवे काम करण्यास सुरुवात केली आहे.