सिंधुदुर्ग : आंबोली घाटात वाळूचा ट्रक दरीत कोसळला, एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 03 Mar 2017 08:19 PM (IST)
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात वाळूचा ट्रक दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात ट्रकचालक सागर बिर्जेचा मृत्यू झाला आहे. मालवणहून बेळगावच्या दिशेनं वाळू घेऊन जाणारा ट्रक आंबोली घाटात कोसळला. ट्रक चालकाचं नियंत्रण गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं घाटातील संरक्षक कठडा तोडून ट्रक खोल दरीत कोसळला. पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. मात्र खोल दरीत कोसळल्यानं ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. आंबोली घाट हा सिंधुदुर्ग आणि बेळगावला जोडणारा घाट म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना आंबोली घाटात वाढल्या आहेत. त्यामुळे अरुंद रस्त्यामुळे अपघात होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.