Amravati Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसची धडक ट्रकला झाली. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना अमरावतीच्या जवळ असणाऱ्या धामणगावजवळ पहाटेच्या सुमारास घडली. घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. (Samruddhi Highway Accident)


लक्झरी बस चालक ठार, 15 जखमी


समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसचालक जागीच ठार झाला असून बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. पुणे ते नागपूर जाणाऱ्या या लक्झरी बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून जवळपास 15 जण यात जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पहाटे घडलेल्या या घटनेनंतर प्रवाशांमध्ये खळबळ आहे. 


शहापूरजवळ 5 वाहनांचा विचित्र अपघात; 3 जणांचा मृ्त्यू, 15 जखमी


 मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरमधील गोठेघरजवळ आज भीषण अपघात झाला. बस ,कंटेनर, ट्रक व टेंपोचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे.सदर अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात 15 ते 16 जण जखमी झाले असून दोन ते तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस व जीवरक्षक दल दाखल झाले आहेत.


लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं


पोटच्या लेकीचा विवाह अवघ्या चार दिवसांवर आला असतानाच बापानेच गोळ्या घालून ठार केल्याची भयावह घटना ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या 20 वर्षांच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर वडील 10 मिनिटे पिस्तूल फिरवत राहिला होता. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजता आदर्श नगर महाराजपुरात घडली. चार दिवसांनी 18 जानेवारीला मुलीचे लग्न होणार होते. पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं आहे. ग्वाल्हेरचे एसपी धरमवीर सिंग आणि सीएसपी महाराजपुरा घटनास्थळी पोहोचले. खुनाच्या आरोपींमध्ये मुलीच्या चुलत भावाच्या नावाचाही समावेश आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच मुलीने एक व्हिडिओ जारी केला होता की, आणि म्हटले होते की, तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम होते.