Sambhajiraje Chhatrapati Agitation Live : मागण्या मान्य झाल्यानं संभाजीराजे छत्रपतींनी उपोषण सोडलं
MP Sambhajiraje Chhatrapati Agitation Live Update : खासदार संभाजीराजे हे शनिवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी ते उपोषणाला बसले आहेत.
Sambhajiraje Chhatrapati Agitation : मागण्या मान्य झाल्यानं संभाजीराजे छत्रपतींनी उपोषण सोडलं आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांचे संभाजीराजेंनी आभार मानले.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा ताफा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला, शेगाव येथील शिवाजी चौकात एका 12 वर्षीय मराठा मुलाने ताफा अडविला
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या खा.संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अडवला ताफा.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं , यासाठी ताफा अडवून ना.नितीन राऊत यांना दिलं निवेदन.
दोन दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर आहेत ऊर्जा मंत्री ,यावेळी पोलिसांची चांगलीच दमछाक बघायला मिळाली.
संभाजीराजे भावूक झाले, काही वारकरी त्यांना पाठिंबा द्यायला आल्यानंतर काही अभंग वारकऱ्यांनी सादर केले. त्यांचं कौतुक करताना संभाजीराजे भावुक झाले. डोळ्यात अश्रू
Kolhapur News Updates : कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाकडून अचानक रास्ता रोको आंदोलन, पालकमंत्री सतेज पाटील आंदोलनस्थळी येणार आहेत, त्याआधी रास्ता रोको
मुख्य समन्वयक वर्षा बंगल्यावर चर्चा करण्यासाठी निघाले आहेत. यामध्ये 18 समन्वयक आणि 2 विद्यार्थी असं 20 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.
गेल्या 60 तासाहून अधिक काळ झाले खासदार संभाजीराजे आमरण उपोषण करत आहेत. बॉडी हायपोप्लासियात गेली आहे. यात त्यांचा ब्लड शुगर आणि रक्तदाब कमी झाली आहे. सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इन्जेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ते उपोषणावर असल्याने त्यांनी यासंदर्भात नकार दिला आहे.
सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण आलं असून आज वर्षा बंगल्यावर सकाळी 11 वाजता चर्चा होणार आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. आंदोलन कुठवर न्यायचं हे सरकारनं ठरवावं, असंही खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, आज सकाळी अचानकच शुगर आणि रक्तदाब कमी झालं आहे. आमरण उपोषण करायची माझी इच्छा नाही. महाराजांनी ज्याप्रकारे अन्यायाविरोधात लढा दिला त्याप्रकारे मी सुद्धा प्रयत्न करतोय, असं ते म्हणाले.
खासदार संभाजीराजे म्हणाले की, गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिलीय. महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे. त्यामुळे ज्या 22 मागण्यांपैकी 6 मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात. या मागण्यांना कोर्टाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं ते म्हणाले. याआधी देखील असे निर्णय झाले आहेत. माझ्या बोलण्यात काही वेगळं नाही आहे. मला त्रास होतोय, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय. सरकारकडून बोलवणं आलंय, असं ते म्हणाले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावतीने जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली 11 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती श्री. संभाजीराजे भोसले यांनी मुंबईत आझाद मैदानावर कालपासून उपोषण सुरू केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज त्यांची आझाद मैदान येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व संभाजीराजेंना उपोषण मागे घेण्यासंदर्भात विनंती केली. मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकार सकारात्मक असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. मराठा समाजातील युवक व विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी विविध शासकीय योजनांमधून राज्य सरकार मदत देऊ करत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मांडलेले प्रश्न लवकर सुटलेच पाहिजेत. मात्र छत्रपती संभाजीराजे यांची प्रकृती देखील आमच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.
संभाजीराजेंना अशक्त पणा आहे मात्र त्यांची प्रकृती नॉर्मल असून त्यांची दर सहा तासाला तपासणी करण्याच्या सूचना डॉक्टरांना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय,
त्यांची सर्व तपासणी करण्यात येत असून सभाजीराजेंच्या तब्येतीच्या अनुषंगाने सम्पूर्ण काळजी घेत असल्याच देखील टोपे म्हणालेत.
कोल्हापुरातील मराठा संघटनांकडून राज्य सरकारला मंगळवार पर्यंतचा अल्टिमेटम
संभाजीराजेंच्या मागण्या मान्य न केल्यास बुधवारपासून जिल्ह्यात उग्र आंदोलन छेडणार
बुधवारनंतर कशा पद्धतीने आंदोलन होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल
मराठा संघटना प्रतिनिधींचा राज्य सरकारला इशारा
संभाजीराजे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली कोल्हापुरात संघटना प्रतिनिधींची बैठक
मागण्यांसंदर्भात दिलीप वळसे पाटील, मुख्य समन्वयक आणि संभाजीराजे चर्चा करत आहेत
आंदोलनाला बसू नये असे अवाहन खासदार संभाजीराजेंना केले होते असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. राज्य सरकारच्या आखत्यारीत जे मुद्दे आहेत, ते सोडवू, मात्र जे राज्याच्या आखत्यारीत नसतील ते सोडवणे कठीण असल्याचे अजित पवार म्हणाले. केंद्र सरकार पार्लमेंटमध्ये तशा पध्दतीचे बिल काढू शकते. प्रश्न सोडवण्यासाठी आग्रह धरावा, परंतु अशा प्रकरे न बसता मार्ग काढावा असेही अजित पवार म्हणाले.
आम्ही त्वरीत मुख्यमंत्र्यांकडे जात आहोत. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल. आपला राग मी समजू शकते उगाच रागात आवेशात काही चुकीचं करु नका असे वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
न्याय तुम्हाला देखील मिळणार आहे. पक्ष प्रमुखांशी भेटणार आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी बोलणार असल्याचे पेडणेकर म्हणाले.
माझ्या राजघराण्यातील राजा उपोषणाला बसला आहे. एक मराठा उभा आहे तुमच्यासमोर, लाख मराठा म्हणून बोलत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले. शब्द एकच देईल, उद्धवजींकडे जाणार आणि लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणार असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. राजे तुमच्या प्रकृतीला बाधा येईल असं काही न करता लवकर प्रयत्न करणार, तुमच्या मागण्या मांडेन असे सावंत म्हणाले.
सगळ्यांच्या भावना आक्रोश मी समजू शकतो. मी 2007 पासुन या लढ्यात आहे . मी टिका करण्यासाठी उपोषण करत नाही. समाजाला वेठीस धरु नये असेही संभाजीराजे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार मार्ग काढू शकते असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला. गरीब मराठा समाजाला न्याय द्या, आताचा राग कोणाबद्दल नाही असेही संभाजीराजे म्हणाले. मला कोणाला दोषी धरायचे नाही. या समाजाला न्याय मिळायला हवा ही माझी प्रमाणिक इच्छा असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
पार्श्वभूमी
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhijiraje Chhtrapati) हे आमरण उपोषणाला बसले आहेत. कालपासून आझाद मैदानावर त्यांच्या उपोषणाल सुरूवात झाली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानातच पहिल्या रात्रीचा मुक्काम केला. दरम्यान, मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार संभाजीराजेंनी केला आहे.
15 फेब्रुवारीला संभाजीरजे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. कालच्या दिवसभरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. तसेच राज्यातील विविध संघटनांनी देखील संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या उपोषणाला अनेक संघटनांसह नेत्यांचा देखील पाठिंबा मिळत आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भर पडली आहे. त्यांनी संभाजीराजे यांना पाठिंब्याचे पत्र देत या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, काल दिवसभरात अनेक नेत्यांनी उपोषणस्थळी हजेरी लावली, तसेच संभाजीराजे यांची भट घेतली. भाजपचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे देखील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज तुळजापूर येथे लक्षणिक उपोषण करणार आहेत. तसेच काल हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी देखील उपोषणस्थळी हजेरी लावत संभाजीराजे यांना पाठिंबा दर्शवला. छत्रपती घराण्याच्या तलवारीची ख्याती आहे. आज या राजघराण्याला मराठा समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावं लागतंय. संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस आहे असं शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलंय. माझे राजे उपाशी असताना मी घरात कसा बसेन? मी इथं छत्रपतींचा मावळा म्हणून आलोय. दिल्लीमध्ये आम्ही राजेंच्या सोबत लढतोय. आज मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राजघराण्याला उपोषणासाठी बसावं लागतंय हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस असल्याचे ते म्हणालेत. महाविकास आघाडीच्या या संदर्भात बैठका सुरू आहेत. मी यासंबंधी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाने मांडणार असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असेही माने म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -