Sambhaji Raje Chhatrapati Raigad News :  किल्ले रायगडावरील रोपवे कंपनीची कामे अनधिकृत असल्याचा आक्षेप संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला आहे. याबाबत त्यांनी पुरातत्व विभागाकडून अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी महासंचालकांना निवेदन दिलं आहे. किल्ले रायगडावरील रोपवे कंपनी विरोधात संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. तक्रार देऊनही या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली नसल्याचे संभाजीराजे म्हणाले. 

Continues below advertisement

किल्ले रायगडावरील रोपवे कंपनी ही गडावर अनधिकृत व्यावसायिक बांधकाम करत आहे

किल्ले रायगडावरील रोपवे कंपनी ही गडावर अनधिकृत व्यावसायिक बांधकाम  करत असून याबाबत आम्ही वारंवार भारतीय पुरातत्व विभागाकडे तक्रार करून ही कामे थांबविण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत. मात्र, यासंदर्भात कोणतीच कारवाई या कंपनीवर करण्यात आली नाही अशी माहिती रायगड विकास प्राधिकरण विभागाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. त्यांनी यासंदर्भात दिल्ली येथे भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यादुबीर सिंह रावत यांची भेट घेऊन याबाबतीत निवेदन दिले आहे. 

अशा बांधकामामुळे वारसास्थळाचा दर्जा धोक्यात येऊ शकतो 

किल्ले रायगडाला युनेस्कोच्या यादीत जागतिक मानांकन मिळालं असून अशा बांधकामामुळे हा वारसास्थळाचा दर्जा धोक्यात येऊ शकतो असं सुद्धा त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. भविष्यात अशी अपमानास्पद वेळ आपल्यावर आली तर या गोष्टीला पूर्णतः रोपवे कंपनी आणि या कंपनीला पाठीशी घालणारे लोक आणि डोळेझाक भूमिका बजावणारे पुरातत्व विभाग जबाबदार असतील असा संताप त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट मधून व्यक्त केलाय. भविष्यात किल्ले रायगडावरील ही रोपवे काढून त्या जागी रायगड विकास प्राधिकरण मार्फत शासकीय रोपवे उभारण्याचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासाठी लागणारी प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल असेही ते म्हणाले. छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांच्या सोशल मीडिया मधून पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

Continues below advertisement

रायगड विकास प्राधिकरणाला गडावरील मूळ स्मारकांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाच्या हजारो अटी आणि नियमांचा सामना करावा लागतो. महाराजांच्या राजसदरेवर आणि नगारखान्यावर छत बसवण्यासाठी गेली सात वर्षे दिल्लीत पाठपुरावा करूनही परवानगी नाकारली जाते. मात्र, दुसरीकडे रोपवे कंपनीने कोणत्याही परवानगीशिवाय गडावर अतिक्रमण करून हजारो स्क्वेअर फुटांची हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅफे उभारले आहेत असेही संभाजीराजे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Sambhajiraje Chhatrapati : दूर्गराज रायगडावर ऐतिहासिक ठेवा सापडला, संभाजीराजे छत्रपती यांची फेसबुक पोस्टद्वारे ‘यंत्रराज’ बद्दल माहिती