Radhakrishna Vikhe Patil on Manikrao Kokate : सदनिका घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा स्वीकारला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. यावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  हे प्रकरण जुनं आहे. न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावर अन्यायच झाल्याची माझी भावना असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Continues below advertisement

माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारावा, असं पत्र अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. अजित पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्या पोस्टद्वारे अजित पवार यांनी राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली. आता देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद अधिकृतपणे जाईल.

युतीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संजय शिरसाठ यांच्याकडे दिलेला नाही

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मुंबईची जबाबदारी नवाब मलिक यांच्यावर दिल्याने शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर मलिक यांच्यावर जबाबदारी असेल तर आम्ही युती करणार नाही असं शिरसाठ यांनी म्हंटल होत. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विखे पाटील यांनी संजय शिरसाठ यांचेच कान टोचले आहेत. त्यांच्या पक्षाने युतीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार शिरसाठ यांच्याकडे दिलेला नाही. युती बाबत निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असे विखे पाटील म्हणाले. अन्य कार्यकर्त्यांनी यावर भाष्य करणं योग्य नसल्याचे विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

येत्या काळात मोठ्या संख्येने काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येतील

काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्ष प्प्रवेशावर देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विरोधकांकडून भाजपवर टीका होत आहे. यावर बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले की, दुर्दैवाने विरोधकांकडे माणसाचं थांबायला तयार नाहीत, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. विरोधक केवळ वोट चोरीच्या घोषणेतच अडकले आहेत.याबाबत बिहारच्या जनतेने त्यांना उत्तर दिलं आहे, तरीही एकच मुद्दा विरोधकांकडून लावून धरला जातोय. ज्या पक्षात थांबून न्यायचं मिळणार नसेल तर लोक कसे थांबतील. उलट येत्या काळात मोठ्या संख्येने काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येतील असं राधाकृष्ण विखे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवला