गेल्या आठ दिवसांपासून शहरातील संभाजी भिडे यांच्या नियोजित कार्यक्रमाविषयी माहिती सोशल मीडियावरून फिरत होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि काही संघटनांचा या कार्यक्रमाला कडाडून विरोध होता. सकाळी कार्यक्रमस्थळी या संघटना आल्या आणि त्यांनी भिडेंविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.
यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोंधळानंतर भिडेंचा नियोजित कार्यक्रम पार पडला. घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
भिडे यांना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये. त्यांना जिल्हाबंदी करावी अशी मागणी या संघटनांनी केली होती. दरम्यान कार्यक्रमा अगोदर विरोध करणाऱ्या संघटनांनी घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी लाठीमार केला. शिवप्रतिष्ठानच्या 32 मन सुवर्णसिंहासनासाठी निधी संकलन तसेच आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संभाजी भिडे हे जालन्यात आले होते.
पाहा व्हिडीओ