सोलापूर : इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेवर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी आपल्या आंब्याच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा अजब वक्तव्य केलं आहे. अमेरिकेने एकादशीला अवकाशात यान सोडल्यानेच त्यांना चंद्रावर स्वारी करता आली, असं हास्यास्पद विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे.


अमेरिकेने तब्बल 38 वेळा चंद्रावर स्वारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं होतं. त्यानंतर अमेरिकेने भारतीय कालमापन पद्धती वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना यश आलं, तो दिवस एकादशीचा होता, असा दावा भिडेंनी केला आहे.


अमेरिकन अवकाश संस्थेत 11 पैकी 9 शास्त्रज्ञ हे हिंदू आहेत. हिंदूमध्ये प्रचंड क्षमता असल्याचे ते यावेळी म्हणाले. सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची क्षमता ही भारतीय कालमापन पद्धतीत आहे. आज जगभरात याच कालमापन पद्धतीचा वापर करत अवकाशात यान सोडले जात, संभाजी भिडे यांनी सांगितलं.



इस्रोची चांद्रयान-2 मोहीम


अवघ्या जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहीमेला चंद्राच्या 2.1 किलोमीटर जवळ जाऊन खंड पडला. चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून डेटा विश्लेषणाचं काम सुरु केलं होतं. मात्र संपर्क तुटलेल्या लँडर विक्रमचं चंद्रावरचं निश्चित स्थान कळालं, असल्याचं माहिती इस्रो प्रमुख के. सीवन यांनी दिली आहे.


तसेच लँडरचं सॉफ्ट लँडिंग झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे लँडर विक्रम आणि त्याच्या पोटात दडलेला रोव्हर प्रज्ञान सुस्थितीत असण्याची शक्यता आहे. लँडर आणि रोव्हरशी संपर्क साधण्यात इस्रोला यश आलं, तर चांद्रयान-2 मोहीम 100 टक्के यशस्वी होण्याची शक्यता आहे.



संबंधित बातम्या