सांगली : देशाला संभाजी भिडेंसारखे पंतप्रधान भेटले तरच हा देश वाचेल असे करणी सेनेचे राज्य अध्यक्ष अजयसिंह सिंगर यांनी म्हटले आहे. सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीच्या सांगता समारंभात कार्यक्रमात ते बोलत होते. सिंगर म्हणाले, सध्या देशातील हिंदूचे फार हाल सुरू आहेत, संभाजी भिडे गुरुजी हेच हिंदू धर्माचे खरे धर्म गुरू आहेत. संभाजी भिडेंसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदू धर्म वाचेल असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
सेंगर म्हणाले की, आपल्यासारखे गुरु आम्हाला भेटले हे आमचे नशीब आहे. हिंदू धर्माचे भाग्य आहे. या देशामध्ये हिंदूंची अवस्था बिकट आहे. आज इथलं चित्र बघून मला प्रचंड आनंद झाला. धर्मशिक्षेची आज आपल्या देशाला गरज आहे. आपण खऱ्या अर्थाने हिंदूंचे धर्मगुरू आहात.
श्री शिवप्रतिष्ठानच्या श्री दुर्गामाता दौडीची दसऱ्याच्या दिवशी सांगता झाली. या सांगता दौडी प्रसंगी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी या समारोप दौडीत हजारो धारकरी धावले.
नवरात्रीच्या काळात दररोज पहाटे श्री शिवप्रतिष्ठानची दौड निघते. या दौडीला 36 वर्षांचा इतिहास आहे. यंदाच्या वर्षीही 29 सप्टेंबरपासून सांगलीसह संपूर्ण राज्यात श्री दुर्गामाता दौड सुरू होती. आज दसऱ्याच्या दिवशी या दौडीचा समारोप करण्यात आला. यावेळी शहरातील खणभाग, फौजदारी गल्ली, गावभागातून सांगता दौड काढून शिवतीर्थावर दौडीचा समारोप करण्यात आला.
संभाजी भिडेंसारखे पंतप्रधान भेटले तरच देश वाचेल, करणी सेनेच्या अध्यक्षांचे वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Oct 2019 07:26 AM (IST)
सध्या देशातील हिंदूचे फार हाल सुरू आहेत, संभाजी भिडे गुरुजी हेच हिंदू धर्माचे खरे धर्म गुरू आहेत. संभाजी भिडेंसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदू धर्म वाचेल असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -