जळगाव : भारतीयांमध्ये राष्ट्रीयतेचा अभाव असल्याने हिंदू स्त्री आणि पुरुष राष्ट्रीयतेच्या बाबतीत नपुंसक असल्याचं धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी जळगावमध्ये केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


चीन आणि पाकिस्तान हे भारताचे नंबर एकचे शत्रू आहेत, त्यांच्याविरोधात हिंदूंनी एकजुटीने उभं राहायाला हवं. हिंदूंना आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हे काहीच कळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. जळगावमध्ये जमललेल्या धारकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानबाबत भिडे काय म्हणाले?

भारताचे खरे शत्रू चीन आणि पाकिस्तान हे दोन देश आहेत. त्यांच्या विरोधात भारताने एकजुटीने उभं राहण्याची गरज आहे. मात्र भारतात तसे होताना दिसत नाही. सीमेवर आपले जवान  शहीद होत असताना, आम्ही पाकशी क्रिकेट सामने खेळतो. सणावाराला वाघा बॉर्डरवर त्यांना मिठाई द्यायला जातो, असे भिडे म्हणाले.

चीनबाबत भिडे काय म्हणाले?

तसेच, “चीनने सुद्धा 62 च्या युद्धात विश्वासघात करुन भारतावर युद्ध लादले होते. या युद्धात भारताला आपल्या साठ हजार जवानांची आहुती द्यावी लागली होती आणि  यावेळी लाखो किलोमीटर आपला भूभाग चीनने घशात घातला आहे. अशा संतापजनक आठवणी या दोन्ही देशांच्या असताना आपण मात्र त्याच चीनच्या वस्तू वापरतो. त्यांचे चायनी फूड आपली तरुण पिढी आवडीने खाते आहे याला काय म्हणायला पाहिजे? भारतीय हिंदूंना आपला शत्रू कोण मित्र कोण हे काहीच कळत नाही.” असेही भिडे म्हणाले.

VIDEO : संभाजी भिडे काय म्हणाले?