बारामती तालुक्यातील मेडद येथे खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनच्या भूमीपूजन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
''आपल्याकडे सगळी सत्ता होती. केंद्राची, राज्याची, जिल्ह्याची, तालुक्याची सत्ता होती. सर्व कारखाने ताब्यात होते, पण कधी आपण सत्तेचा गैरवापर केला नाही, सत्तेची मस्ती, नशा, धुंदी आपण कधी डोक्यामध्ये येऊ दिली नाही, असं अजित पवार म्हणाले.
''सत्ता सोज्वळपणे सांभाळायची असते आणि विरोध असला तरी त्याला योग्य पद्धतीने तोंड द्यायचं असतं,'' असं म्हणत अजित पवार यांनी भाजप सरकारला कानपिचक्या घेतल्या.
काय आहे पालघरमधील गोंधळ?
राज्यात आज पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. निवडणूक आयोगाने काही मशिन दुरुस्त केल्या, तर काही ठिकाणी मशिन वेळेत दुरुस्त न झाल्यामुळे मतदार वाट पाहून मतदान न करताच माघारी परतले.