लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेला विजय हा प्रभू श्रीरामामुळे असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे. 'रामाच्या कृपेनेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला भव्य यश लोकसभा निवडणुकीत मिळाले. हे यश फक्त अभूतपूर्वच नाही, तर विरोधकांना भुईसपाट करणारे आहे. ज्यांनी राममंदिरास विरोध केला ते नष्ट झाले. जनतेने लोकसभा निवडणुकीतून निकाल दिला आहे. 350 खासदारांचे बहुमत हाच राममंदिराचा जनादेश आहे. मंदिराच्या दिशेने सरकारनेच आता एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपवायला हवा. श्रीरामाने आम्हाला 350 खासदार दिले. सत्ता दिली. आम्ही त्याच्या जन्मस्थानी त्याला एक हक्काचे छप्पर देऊ शकत नाही?' असा सवाल शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
'उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती हे ‘बाबरी भक्त’ एक झाले. राममंदिरास या दोघांचा विरोध. त्यामुळे ‘जय श्रीराम’चा नारा देणाऱ्या 61 खासदारांना विजयी करून भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले. हे प्रभू श्रीरामाचे भांडार आहे. ते भाजप-शिवसेनेला प्रसाद म्हणून मिळाले. आता वनवासातल्या रामास मुक्त करण्याची जबाबदारी कोणाची? ती शतप्रतिशत भाजप आणि शिवसेनेचीच आहे', असे सांगत या जबाबदारीपासून दुर पळता येणार नाही याची आठवणही शिवसेनेकडून करुन देण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नुकतेच अयोध्येला जाऊन शिवसेनेच्या 18 खासदारांसह रामलल्लाचं दर्शन घेऊन आले आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी नोव्हेंबर महिन्यात देखील उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते.
शिवसेनेच्या खासदारांसह उद्धव ठाकरे अयोध्येत