सांगली: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा अंगरक्षक म्हणून 'शेरा'ची ख्याती सर्वदूर पसरली आहे. नुकताच सांगलीमध्ये महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शेराचा 'आरोग्यरत्न' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सांगलीच्या श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीने 'आरोग्यरत्न' हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सलमान खानचा अंगरक्षक गुरमीतसिंग उर्फ शेरा याला यावेळी 'आरोग्यरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
चंद्रकातदादा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. चांदीची गदा, मानपत्र, रोख रक्कम असे या 'आरोग्यरत्न' पुरस्काराचे स्वरुप आहे.
शेरा अंबाबाई तालीम संस्थेतील मल्लांसोबतही संवाद साधणार आहे. सांगलीतील एसबीजीआय इन्स्टिट्यूटमध्ये पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला अध्यक्षस्थानी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे उपस्थित होते.
शेरा जवळपास गेल्या वीस वर्षांपासून सलमानचा अंगरक्षक म्हणून काम करत आहे. सलमान जिथे जाईल, तिथे शेरा सावलीप्रमाणे त्याच्या मागे असतो. सलमान वर्षाला दोन कोटी रुपये मानधन घेत असल्याचं एका वेबसाईटवर म्हटलं आहे.
शीख कुटुंबातील शेराला लहानपणापासूनच बॉडीबिल्डिंगची आवड होती. 1987 मध्ये तो ज्युनिअर मिस्टर मुंबई आणि पुढच्या वर्षी ज्युनिअर मिस्टर महाराष्ट्र ठरला होता.
अनेक वर्षांच्या घनिष्ठ संबंधांमुळे शेराचं खान कुटुंबीयांसोबत जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे. शेराच्या मुलाला सलमान खान आपल्या चित्रपटात लाँच करणार असल्याचंही म्हटलं जातं.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सलमानचा बॉडीगार्ड शेराला सांगलीत 'आरोग्यरत्न' पुरस्कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2018 09:08 AM (IST)
सांगलीमध्ये महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शेराचा 'आरोग्यरत्न' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -