मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 536 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 43 हजार 342 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.53 टक्के आहे.
राज्यात आज 38 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 3984 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (14), नंदूरबार (0), धुळे (5), जालना (19), लातूर(54), परभणी (27), हिंगोली (20), नांदेड (20), अकोला (21), अमरावती (17), वाशिम (04), बुलढाणा (05), नागपूर (78), यवतमाळ (06), नागपूर (81), वर्धा (5), भंडारा (3), गोंदिया (3), चंद्रपूर (12) गडचिरोली (4 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 19 हजार 480 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,72, 600 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 933 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 22, 02, 811 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 420 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 420 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 355 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,31,749 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4161 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1373 दिवसांवर गेला आहे.
देशात गेल्या 24 तासांत 13 हजार 451 नवे कोरोनाबाधित
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. परंतु, मृतांचा आकडा मात्र फारसा घटलेला नाही. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 13 हजार 451 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच काल दिवसभरात 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 4 लाख 55 हजार 653 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 14 हजार 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या एकूण एक लाख 62 हजार 661 रुग्णं कोरोनाबाधित आहेत. तर देशात आतापर्यंत कोरोनाच्या 3 कोटी 42 लाख 15 हजार 653 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 3 कोटी 35 लाख 97 हजार 339 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.