मुंबई: ‘सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग, राजू शेट्टींना शुभेच्छा.’ अशी  सूचक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

आज नाशिकमधील सुकाणू समितीच्या बैठकीत बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी लवकरच सत्तेतून बाहेर पडण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींना शुभेच्छा दिल्या आहेत. सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग आहे. असं सदाभाऊ यावेळी म्हणाले. त्यामुळे राजू शेट्टींच्या या निर्णयाशी सदाभाऊ सहमत नसल्याचं चित्र सध्या तरी दिसतं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात धुसफूस सुरुच आहे. त्याचदरम्यान, सदाभाऊंनी अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सदाभाऊ मंत्रीपद सोडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.