मुंबई : मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. अंधेरी, गोरेगाव, कुर्ला, घाटकोपरसह कल्याण, डोंबिवली परिसरातही पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. मुंबई, कोकण, विदर्भात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवरील लोकलची वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरु आहे, तर पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील लोकल 10 मिनिटं उशिरा धावत आहेत. सुदैवाने रस्ते वाहतूक सुरळीत आहे.

मुंबईत कुठे किती पाऊस? ( मंगळवारी सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30)
कुलाबा 56.6 मिमी
सांताक्रुज 40.9 मिमी

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ आणि सावंतवाडीजवळ पडलेलं झाड बाजूला काढण्यात आलं आहे. त्यामुळे
मुंबई गोवा हायवेवरील वाहतूक सुरळीत झाली आहे. रात्री झाड पडल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प होती. रात्रभर तळकोकणात मुसळधार पाऊस झाला.

मराठवाडा वगळता राज्यातील बहुतांश भागांत मंगळवारपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाला असला तरीही अजूनही बहुतांश भाग कोरडाच आहे. नाशिक आणि कोल्हापुरातही पावसाचा जोर कायम आहे.