कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यांनतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतःची वेगळी चूल थाटली आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘रयत क्रांती संघटने’ची घोषणा केली.


रयत क्रांती संघटनेचा तुमचा बिल्ला कोणी काढणार नाही. इथून पुढं संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असं सांगत सदाभाऊंनी संघटना बांधणीचे काम जोरात करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. तसंच कर्ज माफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवावी असा ठराव मंजूर करण्यात आला. आपण स्वतः यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पात्र लिहणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. विशेष  म्हणजे या सभेत संपूर्ण भाषणात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी याच नाव घेता अप्रत्यक्ष टीका केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेले महिना-दीड महिना त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा करून कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतल्यानंतर त्यांनी संघटना स्थापनेचा मुहूर्त ठरवला.

करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर सदाभाऊ खोत यांनी जाहीर सभा घेत आपल्या रयत क्रांती संघटने अधिकृत घोषणा केली. संपूर्ण भाषणात सदाभाऊ खोत याच्या नावाचा कोठेही उल्लेख केला नाही. मात्र अप्रत्यक्षपणे टीका देखील केली. सदभाऊंनी कर्जमुक्ती मिळवून घेतली तर त्याच्या दुकानदाऱ्या कशा चालणार त्यामुळं मला सदाभाऊ ला दुकानदारी करायची नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असा टोला देखील त्यांनी लगावला.

पहिल्या टप्प्यात  महाराष्ट्रातील 353 तालुक्यात संघटनेचा विस्तार करण्यात येणार असून येत्या 6 महिन्यात प्रत्येक तालुक्यात 5 हजार कार्येकर्ते तयार करा असं आवाहन त्यांनी केलंय. यावर्षी ऊस आंदोलन करावं लागणार नाही असं सांगत सदाभाऊंनी  उसाचा दर मी दसऱ्याला जाहीर करणार आहे आणि तोच दर तोच अंतिम राहिल अस स्पष्ट केलं. तसंच कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवावी असा ठराव मंजूर करण्यात आला. आपण स्वतः यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

येत्या 30 सप्टेंबरला  इचलकरंजी इथं  होणाऱ्या दसरा मेळाव्यात सदाभाऊ ऊसाचा दर कोणता मागतात आणि संघटनेची पुढील काय असणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.