मुंबई : सचिन वाझे यांचे लक्झरी गाड्यांचे प्रकरण बाहेर आल्यानंतर आणखी एका गोष्टीवर खुलासा झाल्याचं दिसून आलंय. साऊथ मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझे यांनी तब्बल 100 रात्रींचा मुक्काम केल्याची गोष्ट एनआयएने उघडकीस आणली आहे. एनआयएने यासाठी हॉटेलची सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्ड्सची तपासणी केली. त्यातून संबंधित बाब उघडकीस आली आहे.
एबीपी न्यूजच्या प्रतिनिधींनी साऊथ मुंबईच्या हॉलिडे कंपनीशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सांगितलं की साऊथ मुंबईच्या एका टूर एजंटने एक कॉल केला होता आणि संपूर्ण 100 रात्रींसाठी त्या पंचतारांकित हॉटेलमधील लक्झरी रुम बुक केली होती.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ही गोष्ट गेल्या वर्षीची आहे. बुकिंग ज्यांच्या नावे झाली होती ते सचिन वाझे होते की नाही याबद्दल काही माहिती नसल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. एनआयएने ज्यावेळी याचा तपास सुरु केला त्यावेळी सर्वांना ही गोष्ट माहित झाली.
कंपनीने हेही सांगितलं की 100 रात्रींचे बुकिंग म्हणजे ते एका वर्षात कधीही त्या रुमवर जाऊन राहू शकत होते. ज्यावेळी आपण जाऊ त्या रात्रीचा स्टे काऊंट करण्यात येतोय. सूत्रांच्या मते, 100 रात्रींसाठी 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे.
ही रुम बुक करण्यासाठी वाझेंनी जे आधार कार्ड वापरलं होतं त्यावर फोटो तर वाझेंचा होता पण नाव सुशांत सदाशिव खामकर असं होतं.
एनआयएच्या सूत्रांनी सांगितलं की 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या दरम्यान वाझे त्या हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी सचिन वाझे यांना भेटण्यासाठी एक महिला आली होती. याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज एनआयएकडे आहेत आणि त्याचा अधिक तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या :