मुंबई : सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणांमध्ये आता पहिल्यांदा एका महिलेची एन्ट्री झाली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये एक महिला सचिन वाझेंना भेटून निघत असल्याचं दिसल होते, हीच ती महिला असल्याचं सांगितलं जातं आहे. काल एनआयएने (NIA) एअरपोर्टवरून एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. ही महिला सचिन वाझेंच्या पैशांचा व्यवहार बघत होती असा संशय एनआयएला आहे. मात्र ही महिला नेमकी कोण आहे? तिचा सचिन वाझेंशी काय संबंध ? या सर्व प्रश्नांची उत्तरं एनआयए शोधत आहे..


एनआयएने काल एअरपोर्टवरून एका महिलेला चौकशीसाठी आणलं. ही महिला मीरा रोडच्या एका इमारतीत भाड्याने राहत होती. ही महिला सचिन वाझेंच्या पैशांचा व्यवहार बघत असून वाझेंच्या काळ्या पैशांना व्हाईट करण्याचा काम ती करत होती अशी शक्यता एनआयएकडून व्यक्त करण्यात येत आहे. या महिलेचे दुबई आणि इतर आखाती देशामध्ये मोठे नेटवर्क आहे ज्याचा वापर करुन वाझे मुंबईतील वसूल केलेले पैसे देशाबाहेर पाठवत असल्याची माहिती एनआयएकडे आहे. 


गेल्या पंधरा दिवसांपासून एनआयए या महिलेचा शोध घेत होती मात्र या महिलेचा कुठेच पत्ता लागत नव्हता. मिरा रोड मध्ये एका इमारतीत ही महिला भाड्याने राहत होती पण ते घरही बंद होतं. या घराचे मालक पियुष गर्गची एनआयए कडून चौकशी करण्यात आली आणि अखेर या महिलेची माहिती एनआयएला मिळाली. ही महिला मुंबईबाहेर होती. ती मुंबईत परत येत असल्याची माहिती मिळताच एनआयएने तिला एअरपोर्टवरुन अगोदर तिच्या मीरा रोडवरील घरी आणि नंतर एनआयए कार्यालयात चौकशीसाठी आणलं. 


सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार sachin.in आणि sachin.com या दोन id वरून सचिन वाझेंचा पैशांचा व्यवहार या महिलेकडून केला जात होता. आता हे कसले पैसे होते आणि कुठून येत होते हा ही एनआयएच्या तपासचा विषय असण्याची शक्यता आहे. एनआयएला माहिती मिळाली आहे की, या महिलेच्या माध्यामातून भिवंडीमध्ये पैसे ठेवण्यासाठी सचिन वाझे ने जे warehouse बनवले होते त्याचा शोध ही घेतला जात आहे. 


सचिन वाझे जेव्हा ट्रायडेंटमध्ये नाव बदलून राहत होते तेव्हा त्यांच्याकडे पैश्यांची बॅग होती. एक महिला वाझेंना भेटण्यासाठी ट्रायडेंटमध्ये गेली होती ती महिला हीच होती असा दावा एनआयए करत आहे. मात्र एनआयएने या महिलेला फक्त चौकशीसाठी आणल्याचे सांगितलं गेलं असून या महिलेला अजून ताब्यात किंवा अटक केल गेलं नाही आहे. त्यामुळे आता या महिलेकडून एनआयए च्या हाती नेमकं काय लागतय ते पण महत्त्वाचा असणार आहे. या कटात अजून काही लोक सामील असल्याचस सौंषय व्यक्त करण्यात आला होता त्यामूळे ही महिला सुद्धा तर याचा भाग नाही ना ? येणार वेळच सांगेल.