नागपूर : राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. काल तर राज्यात एकाच दिवशी 40 हजारांच्या वर कोरोना रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाचं संकट वाढल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात आधीच झालेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. केंद्राने अचानक लॉकडाऊन लावला, अनेकांचे जीव गेले तसेच रोजगार गेले, आम्हाला ती परिस्थिती राज्यात परत आणायची नाही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे नेते सर्व लॉकडाऊनच्या विरोधात आहेत. मात्र राज्यभरात कडक निर्बंधावर चर्चा होणार. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आमच्या विभागाने फाईल पाठवली आहे. अंतिम निर्णय आज संध्याकाळी होईल, असं वडेट्टीवार म्हणाले.
मुंबई लोकलबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईत लोकल बंद होणार नाही, निर्बंध मात्र लागतील. पश्चिम बंगाल, तामिळनाडू यांनी जसे गर्दी होणार नाही यासाठी नियोजन तसे नवीन नियोजन केले जाईल, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली
राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. काल तर राज्यात एकाच दिवशी 43 हजारांच्या वर कोरोना रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाचं संकट वाढल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. गेल्या वर्षभराच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोना आकड्यांनि नवा उच्चांक गाठला. जवळपास 6.6 लाख कोरोनाग्रस्त आढळून आले असून तब्बल 400% वाढ फक्त एका महिन्यात नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत लॉक डाऊन 'टू बी ऑर नॉट टू बी' असा यक्षप्रश्न ठाकरे सरकार समोर उभा टाकला आहे.
मात्र लॉक डाऊन करण्यावरून ठाकरे सरकारमध्येच मतभेद समोर आले आहेत. तर दुसरीकडे आनंद महिंद्रा सारख्या मोठ्या उद्योगपतींपासून ते हातावर पोट असलेल्या गोर गरीब मजुरांपर्यंत अशा सर्व स्तरातून लॉकडाऊनच्या विरोधात सूर आवळलेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह 'मिनी लॉकडाऊन' चा विचार सध्या सरकार दरबारी सुरू आहे.