Rupali Thombre : माझी विकेट काढायच्या असेल तर आता गाठ माझ्याशी आहे. माझ्या कुटुंबाशी असे कोणी काही करत असतील तर मी गप्प बसणार नाही. माझ्या दोन बहिणी आणि मावशीवर गुन्हे दाखल झाले आहेत, असे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे म्हणाल्या. रुपाली चाकणकर आणि मी आता समोरासमोर लढणार आहे. रुपाली चाकणकर यांनी सुरु केलेले वॉर रुपाली पाटील ठोंबरे संपवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सुनील तटकरे यांनी यावर निर्णय घ्यावा. यावेळी रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्या राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनाम्याची मागणी केली आहे. 

Continues below advertisement

मी काल बीडमध्ये असताना माधवी खंडाळकर यांनी एक व्हिडिओ काढला होता तो डिलीट केला होता. माधवी खंडाळकर आणि तिचा बंधू माझी बहीण यांनी एकमेकांच्या समजूतीने  तक्रारी मागे घेतल्या होत्या. बहिणीने त्यांचे सगळ्यांचे शूटिंग केलं होतं, तो काल विषय संपला होता. आज अचानकपणे दुपारी ती महिला येते परत गुन्हा दाखल करतात, त्यात माझं नाव आहे असं मला कळाले. स्वतःला अटक करून घ्यायला मी आले आहे. मला कळू द्या तर कायद्याचा किती पोरखेळ चालवला आहे असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या. 

पदावर असताना चाकणकर यांनी गैरवापर केला 

माझ्यावर गुन्हा दाखल नाही, माझ्यावर गुन्हा दाखल करावा, माझ्या कुटुंबावर विनाकारण गुन्हा दाखल केला जात आहे. काल तक्रार घेतली नाही. रुपाली चाकणकरांनी माधवी खंडाळकर यांचे प्रकरण पुढे आणले आहे. पदावर असताना चाकणकर यांनी गैरवापर केला आहे. गैरवापर करुन गुन्हा दाखल केला जात असल्याचे ठोंबरे म्हणाल्या. 

Continues below advertisement

 चाकणकर यांनी सुरु केलेले वॉर रुपाली पाटील ठोंबरे संपवणार 

रुपाली पाटील ठोंबरे यांच्या कुटुंबावर गुन्हे दाखल झाले तर चाकणकर यांच्यावरही गुन्हे दाखल होणार. आयोगावर असताना अनेक चुकीची काम केली आहेत. चाकणकर यांनी सुरु केलेले वॉर रुपाली पाटील ठोंबरे संपवणार असल्याचे त्या म्हणाल्या. सुनील तटकरे यांनी यावर निर्णय घ्यावा असे ठोंबरे म्हणाल्या.