Rupali Chakankar : महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात सामील झालेल्या रुपाली चाकणकरांनी मुंबईतील भर सभेत शरद पवारांसोबत असलेल्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. कोणाच्या विरोधात, संघार्षात किवा टीका करत नाही, मात्र जर यासंदर्भात बोलायला लावलं तर आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे, असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेल्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "शरद पवारांनी ओळख दिली. साहेब आमचं दैवत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या विरोधातील कोणतीही भूमिका घेणार नाही, मात्र याचा अर्थ असा नाही की, शरद पवारांसोबत जे नेते आहेत, ते त्यांच्या विरोधात नाही. त्यामुळे आजची बैठक शरद पवारांचा विचार घेऊनच होत आहे. हा विचार कोणाच्या विरोधात, संघार्षात किवा टीकेसाठी नाही मात्र जर यासंदर्भात बोलायला लावलं तर आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे", असा घणाघात रुपाली चाकणकरांनी केला आहे.
Rupali Chakankar : महाराष्ट्रातला माणूस एकत्र येतो, लढतो आणि जिंकतो
अजित पवारांनी विकासाच्या मुद्द्यासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांच्या या निर्णयात आम्ही सगळे सामील आहोत. आज जमलेले सगळे नेते आणि कार्यकर्ते अजित पवारांकडून उर्जा घेण्यासाठी आले आहेत. महाराष्ट्रातला माणूस एकत्र येतो, लढतो आणि जिंकतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे, असल्याचं त्या म्हणाल्य़ा.
Rupali Chakankar : अजित पवारांचं भरभरुन कौतुक
रुपाली चाकणकरांनी अजित पवारांनी केलेल्या कार्याचा पाढादेखील भर सभेत वाचून दाखवला. कोरोनाकाळात अजित पवारांनी जनतेला मोठ्या प्रमाणात मदत केली. याच काळात घराबाहेर निघणं जोखमीचं असताना मंत्रालयात जनतेची सेवा करण्यासाठी येत होते. कोरोना काळात मंत्रालयात येणारे अजित पवार एकमेव नेते होते. याच काळात विधवा महिलांसाठी काम केलं. अनेक योजना आणल्या. मात्र सरकार बदलल्यानंतर त्या योजना मागे पडल्या. महिलांच्या प्रत्येक योजनेसाठी मी आयोग म्हणून करत आहे. विधवा महिलांसाठी काम सुरु होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सहकार्य करतील, याची खात्री असल्याचं त्या म्हणाल्या.
Rupali Chakankar : कामाची पोचपावती म्हणून मला महिला आय़ोगाचं अध्यक्ष पद दिलं अन्...
या संघटनेत काम करताना घरावर तुळशीपत्र ठेवून महाराष्ट्र पिंजू काढला आहे. शहरी भाग, ग्रामीण भाग, आदिवासी वस्त्या, आदिवासी पाड्यांपर्यंत पोहचत मोठ्या प्रमाणात संघटना एकत्र केली. याच अडीच वर्षाच्या कालावधीत काम केलं त्याचं पोचपावती म्हणून मला महिला आय़ोगाचं अध्यक्ष पद दिलं. त्यावेळी संघटनेला ताकद मिळेल, असं त्यावेळी सांगितलं होतं. त्यावेळी माझा राजीनामा घेतला गेल्याचं त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Maharashtra NCP Crisis : आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय; छगन भुजबळांचा नेमका रोख कोणाकडे?