मुंबई : विद्यार्थी जीवनातील पहिली महत्त्वाची पायरी समजल्या जाणाऱ्या दहावी परीक्षेच्या निकाल कधी लागणार याची मुलांमध्ये उत्सुकता आहे. परंतु निकालाच्या तारखेची अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. मात्र सोशल मीडियावर सध्या तारखेबाबत अफवा पसरली जात आहे.


 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवार 01 जून 2016  रोजी दुपारी 1  वाजता ऑनलाइन जाहीर होईल, अशी अफवा व्हॉट्सअॅपवर पसरत आहे

 

 

तसंच विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवरुन निकालाची प्रत डाऊनलोड करुन घेता येईल, अशीही अफवा पसरवली जात आहे. मात्र  बोर्डाकडून निकालाबाबत अद्याप कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

 

 

राज्यात 1 मार्च ते 29 मार्च या काळात दहावीची परीक्षा पार पडली. राज्यातील 17 लाख 27 हजार 496 हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.