नागपूर : हिंदूंमध्ये तुळस अत्यंत पवित्र मानली जाते, मात्र आता हीच तुळस मुस्लिम बांधवांना भेट देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यासंदर्भात अजेंडा आखला आहे.

 
संघाची सिस्टर संघटना असलेली मुस्लीम राष्ट्रीय मंच येत्या रमझानमध्ये हा अजेंडा राबवणार आहे. आप्तेष्टांना तुळस देण्यात येणार आहे, तर शहिदांनाही इबादत देण्याचा फतवा काढण्यात आला आहे. 22 मे रोजी म्हणजेच शब-ए-बारातच्या दिवसापासून या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या देशभरातील 350 पेक्षा जास्त शाखांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही हिंदुत्ववादी संघटना असल्याचं मानलं जातं. त्यामुळे मुस्लीम बांधव या संघटनेपासून दुरावत आहेत. त्यासाठी संघाकडून मुस्लीम राष्ट्रीय मंचाची उभारणी करण्यात आली. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून या मंचाकडे संघानं विशेष लक्ष दिलं आहे. त्याचाच भाग म्हणून हा कार्यक्रम मुस्लीम राष्ट्रीय मंचला देण्यात आला आहे.