मुंबई : एकीकडे अजित पवारांच्या पक्षातील एकेक नेते शरद पवारांच्या गोटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, तर आता दुसरीकडे राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या मित्र पक्षही त्याच वाटेवरून जात असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या खरात गटाने आता त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते लवकरच शरद पवारांसोबत जाणार आहेत. 


महायुतीत दलित आणि मुस्लिम हिताचे रक्षण होत नाही


रिपब्लिकन खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी अजित पवार आणि महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय‌. महायुतीत दलित आणि मुस्लिमांच्या हिताचे रक्षण होत नसल्याने आपण अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सचिन खरात म्हणाले. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत आपण चर्चा केली असून लवकरच पुढचा निर्णय घेणार असल्याचं सचिन खरात यांनी म्हटलंय.


राजेंद्र शिंगणे, रामराजे निंबाळकर साथ सोडणार


या आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिगणे हे शरद पवारांच्या भेटीला गेले असून त्यांनीही अजितदादांची साथ सोडण्याचं जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे. राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभेचे आमदार आहेत. त्याचसोबत येत्या 14 ऑक्टोबर रोजी फलटणचे रामराजे निंबाळकर हे शरद पवारांच्या गटात परतणार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आऊटगोईंग आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू असल्याचं चित्र आहे. 


लोकसभेतील माढा पॅटर्न विधानसभेतही राबवणार


लोकसभेच्या वेळी शरद पवारांनी सोलापूरच्या मोहिते पाटलांना पक्षात प्रवेश घेऊन आपल्या गटातून उमेदवारी दिली. धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपच्या रणजितसिंह मोहिते पाटलांचा पराभव केला. त्यामुळे पवारांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांना परतीचे वेध लागल्याचं दिसंतय. 


लोकसभेत माढा पॅटर्न राबवल्यानतंर आता त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही दिसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले अनेक नेते आता शरद पवारांकडे परतण्यास उत्सुक असल्याचं दिसतंय. 


कागलमध्ये समरजीत घाटगेंनी सर्वप्रथम हाती तुतारी घेण्याचं निश्चित केल्यानंतर इंदापूरमध्येही हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर रामराजे निंबाळकरांचाही मुहूर्त ठरला असल्याची खात्रीलायक बातमी आहे. 


आगामी काळात कोणते नेते तुतारी हातात घेऊ शकतात त्यावर एक नजर टाकुयात,


1) मदन भोसले- वाई विधानसभा
2) विवेक कोल्हे- कोपरगाव विधानसभा
3) बाळा भेंगडे- मावळ विधानसभा
4) बापू पठारे - वडगाव  शेरी
5) प्रशांत परिचारक- पंढरपूर-मंगळवेढा
6) राजन पाटील- मोहोळ विधानसभेत वर्चस्व 
7) बबन शिंदे- माढा
8) दिलीप सोपल- बार्शी
9) रमेश कदम- मोहोळ विधानसभा 


ही बातमी वाचा: