सोलापूर : 'माझ्यासाठी नातं महत्वाचं आहे. पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीपेक्षा नातं कसं आहे हे मला जास्त माहित आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. रोहित पवारांना बळ देण्यात आलंं असून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना डावललं जात असल्याचा दावा लेखिका प्रियम गांधी यांनी आपल्या 'ट्रेडिंग पॉवर' या पुस्तकात देण्यात आला आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलं. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Continues below advertisement

"तसेच कोणतंही पुस्तक हे लेखकाच्या डोक्याने लिहिलं जातं. आज कोणत्या समस्या आहेत याबाबत वाचण्यात माझा जास्त वेळ जातो. त्यामुळे हे जे काही पुस्तक आलेलं आहे. मी केवळ त्याचा कव्हर पेज पाहिलं आहे. आतमध्ये काय लिहिलं आहे याबाबत मला माहिती नाही. पुस्तकात आणखी काही गोष्टी लिहिल्याचं कळलं. त्यांना ही माहिती कुठून मिळाली हे पुस्तक लिहणाऱ्या व्यक्तीलाच विचारावं लागेल," असंही रोहित पवार म्हणाले.

भाजपच्या काही नेत्यांच्या घरातही अशी लग्न झाली आहेत, मला जास्त बोलायचं नाही : लव जिहादवर रोहित पवारांचं वक्तव्य यावेळी आमदार रोहित पवार यांनी लव्ह जिहादच्या मुद्यावर देखील भाष्य केलं. "उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. याबाबत मला फार खोलात जायचे नाही. भाजपचे काही मोठे नेते आहेत, त्यांच्या घरात देखील अशा पद्धतीने लग्न झाले आहेत. हा पूर्णपणे वैयक्तिक विषय आहे. लग्नाबाबत निर्णय घेण्याचा हक्क व्यक्तीचा असतो. हा हक्क संविधानाने दिला आहे. राम कदम यांना सांगा की राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा मुद्दा आहे. पाच वर्षात भाजपने केलेल्या पराक्रमाचे हे परिणाम आहे. मुख्य मुद्दा सोडून इतर मुद्यांवर बोलत बसल्याच भविष्यातील पिढी ही बर्बाद होईल" अशी टीकाही आमदार रोहित पवार यांनी केली.

Continues below advertisement

पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळपास सहा विविध ठिकाणी सभा देखील घेतल्या. करमाळा, टेंभूर्णी, मोहोळ, बार्शी, कुर्डूवाडी इत्यादी ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी मेळावे, बैठका, सभा घेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. या सभांना तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सोलापुरातील निर्मलकुमार फडकुले सभागृहात आमदार रोहित पवार यांच्यासह सेल्फी घेण्यासाठी, सत्कार करण्यासाठी युवकांची झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार भाजपला पाठिंबा देणार होते, असा दावा प्रियम गांधी यांच्या 'ट्रेडिंग पॉवर' या पुस्तकात करण्यात आला आहे. तसंच पार्थ पवारांना डावललं जातंय आणि रोहित पवारांचं बळ वाढवलं जातं आहे असं या पुस्तकात म्हटलं आहे. त्यामुळे पवार घराण्यात सारं काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. परंतु रोहित पवार यांनी हे सगळे दावे फेटाळले आहेत.

Trading Power | 35 दिवसांच्या सत्तासंघर्षाचा उलगडा करणारं 'ट्रेडिंग पॉवर' पुस्तक! स्पेशल रिपोर्ट