Rohit Pawar : छत्रपती शिवाजी महाराजांबाबात (Chhatrapati Shivaji Maharaj) काहीही वक्तव्य केलं तरी चालेल, असा अहंकार आहे. हा अहंकार दूर व्हायला हवा. हा विषय आजच्या पीढीचा नसून तो पुढच्या पीढीचा आहे. आपण कोणता इतिहास पुढच्या पीढीपर्यंत पोहोचवत आहोत, याचा विषय आहे. अशा अहंकार करुन अस्मितेला तडा जात असेल तर हे चुकीचं आहे, असं मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी व्यक्त केलं आहे. 


महापुरुषांच्या सन्मानासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आत्मक्लेश आंदोलन केलं आहे.  छत्रपती संभाजी महाराजांंच्या समाधी स्थळी वढु बुद्रुक या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन केलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मेटकरी,सुनील टिंगरे,अशोक पवार,संदीप क्षीरसागर,यशवंत माने हे नेते उपस्थितीत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सतत आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन केलं आहे. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता मौन धरून आत्मक्लेश करण्यात आला. यावेळी विविध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 


रोहित पवार म्हणाले,  आम्ही कोणतंही राजकारण करत नाही. आज आम्ही केलेलं आत्मक्लेश राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून मुळीच केलेलं नाही. तर महाराजांचे मावळे म्हणून केलेलं आहे. हे मी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे. आमच्या मागे जो बॅनर लागला होता, त्यावर एकाही नेत्याचा आणि पक्षाचा फोटो नाही आहे. आम्ही केवळ थोरपुरुषांचे फोटो लावलेले आहेत. याच थोरांचा वारसा आमच्यासाठी महत्वाचा आहे. म्हणूनच आज आम्ही छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या भूमिकेचं समर्थन करतोय. त्यामुळे राजकारणाचा यात कोणताही विषय येत नाही, राजे कधीही हतबल होत नाही आणि ते हतबल झाले नाहीत, असं म्हणत त्यांनी उदयनराजे भोसलेंच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. 


त्यांनी माफी मागावी; अमोल मिटकरी
या आत्मक्लेश आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी राज्यपालांना माफी मागावी अशी मागणी केली.  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आतापर्यंत अनेकदा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. एकदा माणसाकडून चूक होऊ शकते मात्र वारंवार असे वक्तव्य होत असेल तर त्यांनी सगळ्यांची माफी मागायला हवी. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील माफीची मागणी केली आहे. त्याेच्या मताशी सहमत असल्याचं अमोल मिटकरींनी सांगितलं आहे. हे सगळं मुद्दाम आणि ठरवून केलं जात आहे. त्यामुळे यांच्या वक्यव्याचा विरोध झाला पाहिजे, असंही ते म्हणाले.