मुंबई : रोहित पवारांची (Rohit Pawar)  संघर्ष यात्रा (Sangharsh Yatra)  दिवाळीनंतर (Diwali 2023) पुन्हा सुरु होणार आहे. रोहित पवारांची संघर्ष यात्रा मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे थांबवण्यात आली होती.  युवकांच्या प्रश्नावर रोहित पवारांची संघर्ष यात्रा नागपूरपर्यंत जाणार आहे. यंदाची दिवाळी रोहित पवारांची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत तसेच नांदेड येथील दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यासह साजरी करणार आहेत. रोहित पवारांची संघर्ष यात्रा मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे थांबवण्यात आली होती.  


राज्यातील आंदोलनाची परिस्थिती आणि युवकांची स्थिती पाहता हा निर्णय घेणं गरजेचं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं होते. तसेच राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अनेक तरुणांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या देखील केली, या सगळ्या चिंताजनक परिस्थितीमुळे रोहित पवारांनी त्यांची यात्रा स्थगित केली होती. दररोज 17 ते 22 किलोमीटर अंतर ही पदयात्रा कापणार आहे. 45 दिवस ही पदयात्रा असून, ही यात्रा नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पोहोचणार आहे. 


यात्रेचं नियोजन कसं असेल?


आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही 800 किलोमीटरची असणार आहे. त्यात रोज दिवसाला 17 ते 18 किलोमीटरचा प्रवास असेल. पहिला टप्पा 11 किलोमीटरचा असेल. हा टप्पा पूर्ण झाला की, कोरोगावला थांबा असेल. त्यानंतर संध्याकाळी शेवटचा सात किलोमीटरचा टप्पा पार करणार आहेत. प्रत्येक दिवसाची यात्रा ही दोन टप्प्यात असणार आहे. एकूण 45 दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 7 डिसेंबर रोजी होणार आहे.


प्रत्येक गावातील प्रश्न कळणार


रोहित पवार म्हणाले की, 'या यात्रेदरम्यान अनेक गावांमध्ये थांबा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्यादेखील यातून पुढे येणार आहे. त्यामुळे त्यावरदेखील भविष्यात काम करण्याचं नियोजन करणार आहे. सगळ्या महाराष्ट्रात अनेक गावं आहेत आणि या प्रत्येक गावातील नागरिकांच्या वेगळ्या समस्या आहे. त्या समस्या जाणून घेणारं कोणी नाही. त्यांच्यासाठी मी असणार आहे. त्याचे प्रश्न जाणून घेणार आहे.         


हे ही वाचा :