Rohit Pawar On Parth Pawar: 'काहीही झालं तरी पार्थ सुप्रियाताईंच्या विरोधात लढणार नाही', रोहित पवारांकडून 'त्या' चर्चांना पूर्णविराम

Rohit Pawar On Parth Pawar: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पार्थ पवार लोकसभेसाठी उभे राहणार का या प्रश्नावर रोहित पवारांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

Continues below advertisement

Rohit Pawar On Parth Pawar:  'भाजपने कितीही ताकद लावली तरी पार्थ पवार सुप्रियाताईंच्या विरोधात लढणार नाही', असं सूचक वक्तव्य आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे. तसेच  कुटुंबाच्या विषयात काही झालं तरी अजितदादा वेगळी भूमिका घेणार नाहीत असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पार्थ पवार (Parth Pawar) लोकसभेच्या निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभे राहणार का या चर्चांनी जोर धरला होता. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

'बारामतीची जनता हुशार आहे'

लोकसभेच्या निवडणुकांवरुन सध्या सुरू असलेल्या चर्चांवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असा सामना देखील रंगणार नसल्याचं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 'बारामती विधानसभेतून फक्त आणि फक्त दादच जिंकून येतील', असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर लोकसभेच्या निवडणुकांबाबत बोलताना रोहित पवारांनी म्हटलं की, 'बारामतीची जनता हुशार आहे.' 

अजित पवारांच्या बंडानंतर पक्षात आणि पवार घरात फुट पडल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. पण आता कोणत्या मतदारसंघातून पवारांच्या घरातून कोण लढणार या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. पण यावर रोहित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्या चर्चांना पूर्णविराम दिला गेल्याचं म्हटलं जात आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'मला असं वाटतं की भाजप अजित पवरांची ताकद कमी करेल'. तर यावेळी रोहित पवारांनी बारामतीमधून फक्त अजित पवारच निवडून येतील असं देखील रोहित पवार म्हणाले आहेत. 

'भाजपमध्ये लोकमान्यता असलेलं नेतृत्व संपलं आहे'

रोहित पवारांनी यावेळी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 'भाजप आधी लोकनेत्यांना जवळ घेतात आणि नंतर त्यांना संपवतात, त्यांनी त्यांच्या पक्षातही तेच केलं आहे', असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. तर 'भाजपमध्ये लोकमान्यता असलेलं नेतृत्व संपत चाललं आहे', असं देखील रोहित पवार म्हणाले आहेत. 

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना देखील पूर्णविराम मिळाला असल्याने आता आगामी निवडणुकांमध्ये कोणतं चित्र पाहायला मिळणार याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे. तर आता यावर अजित पवरांकडून काही उत्तर मिळणार का हे पाहणं देखील गरजेचं आहे. 

हे ही वाचा :

Rohit Pawar On Ajit Pawar : दादांविरोधात बारामतीमध्ये उमेदवारी मिळाल्यास लढणार?, रोहित पवार म्हणाले...

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola