Rohit Pawar on Sanjay Shirsath : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यापल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा संदर्भ देत खातेबदल पत्रावर मंजुरी दिली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खात्यांची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar)  म्हटलं आहे. या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा! आम्ही मात्र मंत्री संजय शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत असे रोहित पवार म्हणाले. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 

मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय असल्याचे रोहित पवार म्हणाले. वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहे हे दाखवून द्यायला हवं होतं. यामुळं किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे.असो! या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा! आम्ही मात्र मंत्री शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत असे सूचक ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. त्यामुळं आता विरोधकांचा मोर्चा माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे वळणार असल्याचं बोललं जात आहे. 

सदनिका घोटाळाप्रकरण! माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा कायम 

नाशिक सत्र न्यायालयाने काल (मंगळवारी, ता 16) सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यामुळं माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. विरोधी पक्ष माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले होते.  कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र, त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे.

Continues below advertisement

माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद काढून घेतलं आहे. माणिकराव कोकाटेंची खाती अजित पवारांकडे वर्ग करण्यात आल्याने ते आता बिन खात्याचे मंत्री बनले आहेत. क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग ही खाती अजित पवारांकडे सोपवली गेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र दिल्यानंतर राज्यपालांकडूनही त्यास मंजुरी देण्यात आली. 

महत्वाच्या बातम्या:

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला