Harshvardhan Patil Met Nitin Gadkari : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गडकरी यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर अन्य काही मागण्या देखील केल्या आहेत.
अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत
सध्या ठीक ठिकाणची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत यासह पालखी मार्ग सुधारणे संदर्भातील अनेक मागण्या आज केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्याकडे नवी दिल्ली येथे भेट घेऊन पत्राद्वारे केल्या आहेत. या भेटी प्रसंगी मा.जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या. दरम्यान, पालखी मार्गाच्या निकृष्ट दर्जांच्या कामांची चौकशी करून, अपूर्ण कामे पूर्ण करणे व पत्रातील इतर मागण्या संदर्भात तातडीने संबंधितांना आदेश देण्यात येतील, असे नितीन गडकरी यांनी या भेटीत नमूद केल्याची माहिती देण्यात आली आहे. संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. या कामाची तातडीने चौकशी करावी अशा प्रकारची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. त्यामुळं आता हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या मागणीवर नितीन गडकरी काय निर्णय घेणार? खरच या मार्गात झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी करणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा देहू ते लोणी काळभोर, यवत, इंदापूर, बारामती, अकलुजमार्गे पंढरपूरला जातो
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा देहू येथून सुरू होतो. पुढे तो पंढरपूरला संपतो. हा एक पवित्र मार्ग आहे, ज्यात वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. हा मार्ग पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर, यवत, इंदापूर, बारामती, अकलुज यांसारख्या गावांतून जातो. आता या मार्गाला NH-965 अंतर्गत विकसित केले जात आहे. ज्यात वारकऱ्यांसाठी सुविधा आणि वृक्षारोपण केले जात आहे, ज्यामुळे हा मार्ग अधिक सोयीस्कर होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला