आजोबांचा निरोप घेऊन रोहित पवार स्वाभिमानीच्या रविकांत तुपकरांना भेटले
एबीपी माझा वेब टीम | 21 Feb 2019 03:04 PM (IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हातकणंगले बरोबरच बुलडाणा आणि वर्धा जागेची मागणी केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठी स्वाभिमानीने बुलडाण्याची जागा मागितली आहे.
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाआघाडीत यावे यासाठी वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबत सुरू असताना युवा नेते देखील मागच्या दरवाज्याने चर्चा करत आहे. दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची भेट घेतली राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी घेतली. आजोबा शरद पवार यांचा निरोप घेऊन रोहित पवार हे स्वाभिमानीच्या रविकांत तुपकरांना भेटले असल्याचे बोलले जात आहे. बुलडाण्यात या युवा नेत्यांची एक तास झाली चर्चा झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हातकणंगले बरोबरच बुलडाणा आणि वर्धा जागेची मागणी केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठी स्वाभिमानीने बुलडाण्याची जागा मागितली आहे. या बैठकीत बुलडाण्याच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. ही जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तिथून डॉ.राजेंद्र शिंगणे हे उमेदवार असणार आहेत. काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या जागेवरून वाद सुरू असताना देखील रोहित पवार यांनी सुजय विखे पाटील यांची भेट घेतली होती.