Rohit Pawar : आज राज्यातील 23 नगरपालिकांसह 76 नगरपंचायतीसाठी मतदान प्रकिया पार पडत आहे. विविध जिल्ह्यातील एकूण 143 सदस्यपदांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, या मतदानाच्या मुद्यावरुन राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी मतदार चोरी आणि पैसे वाटल्याच्या आरोपावरुन भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याचा फार्स न करता थेट बोली लावूनच भाजपाच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं असे मत रोहित पवारांनी व्यक्त केलं आहे. ते नेमकं काय म्हणाले ते पाहुयात. 

Continues below advertisement

नेमकं काय  म्हणाले रोहित पवार?

अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदेंच्या शिवसेनेने 200 बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तर इथंच भाजपाच्या उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटताना अजितदादांच्या राष्ट्रवादीने दोघांना पकडून भरारी पथकाच्या ताब्यात दिल्याचे रोहित पवार म्हणाले. त्याचबरोबर नांदेडच्या धर्माबादमध्ये पैशाचं अमिष दाखवून भाजपाने शेकडो मतदारांना कोंडून ठेवत लोकशाहीचा जाहीर लिलाव मांडल्याची टीका देखील रोहित पवार यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाने थेट बोली लावूनच भाजपाच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं 

लोकशाहीचं असं वस्त्रहरण होत असताना कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सत्ता मिळवून देण्याच्या मोहात अडकलेला निवडणूक आयोग मात्र ध्रुतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून शांत बसल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे. हे असंच चालायचं असेल तर निवडणुक आयोगाने निवडणुका घेण्याचा फार्स न करता थेट बोली लावूनच भाजपाच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या विजयाच्या जल्लोषात सहभागी होऊन गुलाल अंगावर घ्यायलाही हरकत नाही.  यामुळं किमान निवडणुकीसाठी खर्च होणारा सरकारी तिजोरीतील पैसा तरी वाचेल असे रोहित पवार म्हणाले. 

Continues below advertisement

न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या महाराष्ट्रातील 23 नगरपालिकांसह 76 नगरपंचायती 154 जागांसाठी मतदान घेण्यात आले.  महाराष्ट्रात पहिल्यादांच मतदानावेळी धक्कादायक प्रकार घडला आहे. मतदानासाठी आलेल्याकाही मतदारांना लग्नाच्या हॉलमध्ये कोंडून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठवाड्यातील नांदेडसह मुंबईजवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये देखील मतदारांना कोंडून ठेवण्यात आले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी राष्ट्रवादीने भाजप विरोधात तक्रार दाखल केली आहे.  तसेच काही ठिकाणी पैसे वाटल्याचे प्रकार देखील घडल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?