Rohit Pawar : बजेटमध्ये एक रुपयाचं नियोजन झालं नाही. या अधिवेशनामध्ये शिक्षकांसाठी 1000 कोटी देतील अशी अपेक्षा होती असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मुंबईत अधिवेशन सुरू असताना 12 ते 15 हजार शिक्षक महिलांसह अनेक शिक्षक आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत. अपेक्षा एवढीच होती की शिक्षणमंत्री इकडे येतील आणि मार्ग काढतील. पण संध्याकाळ झाली तरी कुणी आले नसल्याच रोहित पवार म्हणाले. सरकारकडे कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसा आहे पण शिक्षकांसाठी पैसे नाहीत असेही रोहित पवार म्हणाले.
जेव्हा विधानसभेचे इलेक्शन लागणार होतं तेव्हा आचारसंहिता लागणार होती तेव्हा एक दिवस आधी महाराष्ट्रामध्ये शिक्षकांसाठी एक जीआर काढला होता. 40 60 असं वेगवेगळे जीआर शिक्षकांसाठी काढले होते. अनेक आमदारांनी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला आहे. कुठेतरी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हा जीआर काढला आहे. जीआर निघाला इलेक्शन झालं मतदान मिळाला पण सत्तेत आल्यानंतर बहुमत मिळालं. आतापर्यंत दहा महिने झाले जीआर फक्त कागदावरच आहे. कोणत्या शिक्षकाला अनुदान दिलं नाही असे रोहित पवार म्हणाले.
एक निर्णय घ्या, शिक्षकांसाठी एक चांगली बातमी द्या
आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने गिरीश महाजन या ठिकाणी आले आहेत. उद्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री एकत्रित बसतील. एक बैठक आयोजित करत त्या ठिकाणी आमदार आणि शिक्षक राहतील. एक असा कागद उद्या सरकारला द्यावा लागेल की शिक्षकांच्या अकाउंटला हजार कोटी येतील अशी अपेक्षा असल्याचे रोहित पवार म्हणाले. काही आमदार या ठिकाणी रात्रभर राहतील. सरकारला विनंती आहे सकाळी 11-12 वाजेपर्यंत कशाला वाट बघता. उद्या असा एक निर्णय घ्या या ठिकाणी शिक्षकांसाठी एक चांगली बातमी द्या यासाठी शिक्षक वाट बघत आहेत असे रोहित पवार म्हणाले. सरकारने लवकर लवकर या मागण्या पूर्ण कराव्यात.
सरकारकडे कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसा आहे
कॉन्ट्रॅक्टरसाठी सरकारकडे पैसा आहे. 85000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग ज्याची गरज नाही त्याला शेतकरी विरोध करताय. 85000 खर्च करुन कशाला रोड बनवता त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असे रोहित पवार म्हणाले. शिक्षकांसाठी जो जीआर काढला हजार कोटीचा तोच द्या. शिक्षकांसाठी द्यायला सरकारकडे पैसा नाही. कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसा आहे. इलेक्शनमध्ये मतदान केलं आहे त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत असे रोहित पवार म्हणाले. उद्या असा जीआर काढा त्यासाठी शिक्षक वर्ग वाट पाहत आहेत असे रोहित पवार म्हणाले.
शिक्षकांचा आंदोलनाला शरद पवार भेट देणार
उद्या या शिक्षकांचा आंदोलनाला 11 वाजता शरद पवार भेट देणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत सुद्धा उद्या सकाळी या शिष्टमंडळांसोबत बैठक होणार आहे. बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावा लागेल नाहीतर हा आंदोलन अजून तीव्र होईल असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.