लातूर : लातूर जवळील साखरा पाटीवरील हिरेमठ पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. पंप मालक श्रीकांत हिरेमठ यांच्यावरही चाकू हल्ला करत त्यांच्या अंगावरील दागिने आणि रोकड लांबवण्यात आली आहे. आज रात्री साडे आठ वाजताची ही घटना आहे.


शहराजवळील साखरापाटी येथील हिरेमठ पेट्रोल पंपावर दरोडेखोरांनी रात्री सशस्त्र हल्ला केला. तीन राऊंड गोळीबार करून केली लूट करण्यात आली. पेट्रोलपंप मालक श्रीकांत हिरेमठ यांच्यावर तीक्ष्ण हत्यार-कत्तीने हल्ला करून जखमी केले. या दरोड्यात 7 तोळं सोनं आणि 50 हजारांची रोकड लंपास करण्यात आली. घटनास्थळी एक रिव्हॉल्वर, 2 जिवंत काडतुसं, 3 रिकामी काडतुसं आणि मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.



श्रीकांत हिरेमठ हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूरमधील लोकमान्य अतिदक्षता केंद्रात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे या पंपावर दीड वर्षांपूर्वीच दरोडा टाकण्यात आला होता.

हल्लेखोरांनी रक्कम लुटल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांना घटनेची माहिती समजताच घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या घटनेमुळ लातूरच्या पेट्रोल पंप चालकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.