यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून चक्क पाण्याने रस्ते धुण्यात आले. यासाठी हजारो लीटर पाण्याची नासाडी करण्यात आली.
यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील सरूळ या गावात मुख्यमंत्र्यांचा दौरा होता. त्यांच्या आगमनासाठी सारं गाव सजलं. ग्राम पंचायत कार्यालय, शाळा, दवाखाना सजवले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पिण्याच्या पाण्याने रस्ता धुऊन काढण्याचा प्रताप केला.
जिल्ह्यात अनेक गावांत पाण्यासाठी वणवण करावी लागते. असं असताना या रस्त्यावर एक वेळ नाही तर चार वेळा टँकरने पाणी ओतून पाण्याची नासाडी केली.