महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी महाराष्ट्राच्या 13 जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या 118 पंचायत समितीयांच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्पयासाठी होणाऱ्या 1288 जागांसाठी 21 फ़ेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीमध्ये भाग घेणाऱ्या 5,166 उमेदवारांपैकी 3,522 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले.
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार कोट्यधीश?
- भाजपाच्या विश्लेशीत केलेल्या 691 उमेदवारांपैकी 85 उमेदवार अर्थात 12% उमेदवार कोट्यधीश आहेत..
- कॉँग्रेसच्या विश्लेशीत केलेल्या 513 उमेदवारांपैकी 80 उमेदवार अर्थात 16% उमेदवार कोट्यधीश आहेत..
- शिवसेनेच्या विश्लेशीत केलेल्या 629 उमेदवारांपैकी 76 उमेदवार अर्थात 12% उमेदवार कोट्यधीश आहेत..
- लोकशाही क्रांति आघाडीने एकाच उमेदवार उभा केला असून हा उमेदवार कोट्यधीश आहे.
- पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी चे 43% उमेदवार कोट्यधीश आहेत.
- कोल्हापूर जिल्हा तारारणी विकास आघाडीचे 40% उमेदवार कोट्यधीश आहेत.
- सीपीआय पक्षाकडे सर्वात कमी अर्थात केवळ 4% कोट्यधीश उमेदवार आहेत.