पुणे : पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात पुण्यात माजी पोलिस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या राजकीय हस्तक्षेपामुळेच पोलिसांवरच्या हल्ल्यांत वाढ होत असल्याचा आरोप यावेळी माजी पोलीस कर्मचाऱ्यांनी केला.

या आंदोलनात माजी पोलिस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले. आयुक्त कार्यालयाबाहेर 250 ते 300 कर्मचाऱ्यांनी आंदोलन करुन पोलिसांवरच्या हल्ल्याचा निषेध केला.

नाशिकमध्ये मैत्रीचं आवाहन करणारे होर्डिंग्ज

दुसरीकडे, पोलिसांवर हल्ले वाढल्याने नाशिकमध्ये मैत्रीचं आवाहन करणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. आमच्यावर शस्त्र उगारु नका, आम्ही तुमचे मित्र आहोत कायद्याचा आदर करा, असे होर्डिंग्ज लावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आरोग्य विद्यापाठीच्या कार्यक्रमासाठी नाशकात येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री जाणाऱ्या मार्गावर चौकाचौकात पोलिसांनी अशा आशयाची होर्डिंग्ज लावली आहेत.

संबंधित बातम्या

पुन्हा वर्दीवर हात, नंदुरबारमध्ये पोलीस उपनिरीक्षकास मारहाण


वर्दीवर हात उचलाल, तर याद राखा : पोलीस महासंचालक


कल्याणमध्ये पोलिस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न


पुन्हा वर्दीवर हात, महिला वाहतूक पोलिसाला महिलेची मारहाण


मारहाणीत जखमी झालेले पोलीस शिपाई विलास शिंदेंचं निधन


मुंबई वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराची धडक, कॉन्स्टेबल जखमी