अपहृत निवृत्त डीवायएसपींना आरोपींनी रत्नागिरीत सोडलं
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2018 06:55 PM (IST)
निवृत्त डीवायएसपींना अपहरण करुन, लुटमार केली आणि त्यांना रत्नागिरीत घेऊन गेले.
सातारा : साताऱ्यात निवृत्त पोलिस उपअधीक्षकाचं (DYSP) अपहरण करण्यात आले होते. पुणे-बंगळुरु महामार्गावर ही घटना घडली. अपहरणकर्त्यांनी निवृत्त डीवायएसपींना चिपळूणमध्ये सोडलं. निवृत्त डीवायएसपी सध्या चिपळूण पोलिस ठाण्यात आहेत. निवृत्त डीवायएसपींना अपहरण करुन, लुटमार केली आणि त्यांना रत्नागिरीत घेऊन गेले. निवृत्त डीवायएसपी कराडहून मुंबईच्या दिशेने जात असताना, आरोपींनी इनोव्हा गाडीने डीवायएसपींची गाडी अडवली. त्यानंतर गाडीसह डीवायएसपींचे अपहरण करण्यात आले होते. डीवायएसपींच्या गाडीत साडेचार कोटी रुपये होते, अशी माहिती मिळते आहे. दरम्यान, अपहरणकर्ते मुंबईच्या दिशेने फरार झाले असून, चिपळूण पोलिसांकडून नाकाबंदी केली आहे.