मुंबई : एबीपी माझाच्या ‘ब्लॉग माझा 2019’ स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. ब्लॉगर सतीश कुलकर्णी  यांना प्रथम पारितोषिक मिळालं आहे, तर ब्लॉगर किरण लिमये आणि नितीन साळुंके यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळालं आहे. त्याचसोबत पाच उत्तेजनार्थ स्पर्धकही निवडण्यात आले.

स्पर्धेला परीक्षक म्हणून ज्येष्ठ लेखिका प्रज्ञा दया पवार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आसाराम लोमटे लाभले.

फेसबुक, ट्विटरसारख्या आधुनिक माध्यमांच्या व्यासपीठांवर अनेकजण लिहितात. मात्र या लेखनाला दीर्घ स्वरुप आणि रचनात्मक रुप मिळतं, ते ब्लॉगसारख्या व्यासपीठामुळे. या व्यासपीठावरील लेखनास अधिक प्रोत्साहन मिळावं म्हणून एबीपी माझातर्फे दरवर्षी ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा आयोजित करण्यात येते.

यंदा या स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद लाभला. 300 हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मराठी भाषेतून ब्लॉग लेखनाचं हे अवकाश विस्तारत जात आहे, अशीच ही आकडेवारी सांगते.

ब्लॉग माझा 2019 स्पर्धेचे विजेते :

प्रथम क्रमांक – सतीश कुलकर्णी

ब्लॉगचे नाव -  खिडकी ब्लॉग

ब्लॉग लिंक -  https://khidaki.blogspot.com/

द्वितीय क्रमांक – किरण लिमये

ब्लॉगचे नाव - शब्दवेल ब्लॉग

ब्लॉग लिंक - http://shabdavel.blogspot.com/

 

तृतीय क्रमांक – नितीन साळुंके

ब्लॉगचे नाव - मला समजतं ते सर्व काही नाही..!!

ब्लॉग लिंक - https://nitinsalunkheblog.wordpress.com/

उत्तेजनार्थ 1 - श्रेणीक नरदे

ब्लॉगचे नाव - श्रेणीक नरदे ब्लॉग

ब्लॉग लिंक - https://shreniknarade.blogspot.com

उत्तेजनार्थ 2 - गणेश मांजरे

ब्लॉगचे नाव - मार्मिक ब्लॉग

ब्लॉग लिंक - https://marmeek.wordpress.com/

उत्तेजनार्थ 3 - पंकज समेळ

ब्लॉगचे नाव - महाराष्ट्र देशा ब्लॉग

ब्लॉग लिंक - https://maharashtradesha.in 

उत्तेजनार्थ 4 - कल्याणी कुलकर्णी

ब्लॉगचे नाव - मनमंदिरा ब्लॉग

ब्लॉग लिंक- https://manmandira.wordpress.com/

उत्तेजनार्थ 5 - आशुतोष महात्मा

ब्लॉगचे नाव -  माझे भावविश्व

ब्लॉग लिंक - https://ashum2.wordpress.com/