Republic Day 2023 LIVE Updates : प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
एबीपी माझा वेबटीमLast Updated: 26 Jan 2023 12:55 PM
पार्श्वभूमी
Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना (Constitution of India) लागू झाली. 15 ऑगस्ट 1947...More
Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना (Constitution of India) लागू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. 26 जानेवारी देशाचा राष्ट्रीय सणवैविध्यपूर्ण धर्म, श्रद्धा आणि संस्कृतींचा देश असलेल्या भारतात दररोज काही ना काही सण साजरे केले जातात. आपल्या देशात प्रत्येक धर्मात सण साजरे करण्याची परंपरा आहे, परंतू, काही सण असे आहेत जे प्रत्येक देशवासीयांसाठी महत्त्वाचे आहेत. ते देशभर आदराने आणि आपुलकीने साजरे केले जातात. 26 जानेवारी हा देखील असाच एक सण आहे. जो देशाचा राष्ट्रीय सण आहे. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा असो, हा दिवस संपूर्ण देशभक्तीने साजरा करतो. इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. 26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन साजरा26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. तत्पूर्वी, 26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पुढील 18 वर्षे या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस अधिकृतपणे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित करण्यात आला.डॉ. राजेंद्र प्रसाद देशाचे पहिले राष्ट्रपतीसंविधान सभेने 1950 मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद (Rajendra Prasad) यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. त्यांनी 1952 मध्ये पहिली आणि 1957 मध्ये दुसरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. राजेंद्र प्रसाद मे 1962 पर्यंत भारताचे राष्ट्रपती राहिले. त्यांचा कार्यकाळ सर्व राष्ट्रपतींमध्ये सर्वात मोठा आहे.
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त अंडरवॉटर फडकवला झेंडा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तारकर्लीचा उपक्रम
Republic Day 2023 :महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तारकर्लीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनी अंडरवॉटर झेंडा फडकवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली मधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने स्कुबा च्या माध्यमातून स्विमिंग फुलामध्ये 15 ते 20 फूट खोल पाण्यात झेंडा फडकवला. यावेळी सर्वजण ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करून पाण्याखाली गेले होते.
Republic Day 2023 : महाराष्ट्राचा चित्ररथ, साडेतीन शक्तिपीठ आणि नारी शक्तिवर आधारीत देखावा
Republic Day 2023 : राजपथावर मोठ्या उत्साहात महाराष्ट्राच्या चित्ररथाचं संचलन पार पडलं. यावर्षी साडेतीन शक्तिपीठ आणि नारी शक्तिवर आधारीत असा देखावा चित्ररथात करण्यात आला होता.
Republic Day 2023 : लग्नमंडपात जाण्याआधी भावंडांनी केलं ध्वजारोहण, गोंदियाच्या राम आणि श्याम यांची तिरंग्याला सलामी
Republic Day 2023 : लग्नमंडपात जाण्याच्या आधी वधु-वरांना मतदान करुन जातना आपन नेहमीच पाहतो. मात्र, गोंदियाच्या चांडक कुटुंबातील राम आणि श्याम या दोन भावंडांनी लग्न मंडपी जाण्यापूर्वी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण केलं. देशाच्या संविधानाला बळकट करण्याचं काम करत सामाजिक संदेश दिला आहे. 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना अमलात आली, त्यामुळे या दिनाची सार्वांना आठवण रहावी यासाठी राम आणि श्याम या दोन भावंडांनी लग्न मडंपी जाण्यापूर्वी 73 व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केले. चांडक कुटुंबातील वऱ्हाड्यांनी यावेळी राष्ट्रगीत म्हणत तिरंग्याला मानवंदना दिली.
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त संगमनेरमधील डी. के. मोरे विद्यालयात महिला हेल्पलाईन क्रमांक 181 ची प्रतिकृती
Republic Day 2023 : अहमदनर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील डी. के. मोरे विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महिला हेल्पलाईन क्रमांक 181 ची प्रतिकृती साकारण्यात आली. या हेल्पलाईनचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी विद्यालयातील 750 मुलींची मानवी साखळी आणि 800 विद्यार्थी तसेच रांगोळीच्या सहाय्याने साकारलेली ही प्रतिकृती लक्षवेधी ठरली.
Dhule News : ध्वजारोहण झाल्यानंतर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
Dhule News : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. शहरातील चित्तोड रोड मिल परिसरातील नागरिक तुळसाबाईचा मळा या ठिकाणी गेल्या 35 ते 40 वर्षापासून राहत आहेत. ते राहत असलेल्या घरांचा हक्काचा सातबारा मिळावा म्हणून धुळे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त व भूमि अभिलेख कार्यालयाकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. मात्र प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या नागरिकांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकार्यालयावर आत्मदहनाचा इशारा दिला होता. आज ध्वजारोहण झाल्यानंतर या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर येत घोषणाबाजी करत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Republic Day 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण
Republic Day 2023 : उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण झाले. नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर ध्वज वंदन होणार झाले. या कार्यक्रमात सर्वच विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये रिक्षावाले, कामगार, फुटकळ व्यवसाय करणारे अशा सामान्य लोकांना पहिल्या रांगेमध्ये स्थान मिळाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लोकशाहीमध्ये हेच अभिप्रेत आहे की जो समाजातील शेवटचा माणूस आहे, त्याला पहिल्या रांगेत आणायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने लोकशाहीची जी मूल्ये सांगितली त्याचा मूलमंत्र घेऊन समाजातील प्रत्येक व्यक्तीला समता आणि समानतेने वागणूक देत प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे अशी रचना आहे. आज आपणा सर्वांना त्याचा गर्व आहे.
प्रजासत्ताक दिननिमित्त सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात आकर्षक सजावट, शक्ती आणि देशभक्तीचा संगम
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. यामध्ये देवस्थानही मागे मागे नाहीत. साडेतीन शक्ती पिठापैकी अर्धयपीठ असणाऱ्या सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण गाभारा भारताच्या राष्ट्र ध्वजाच्या तीन रंगांमध्ये सजला आहे. शक्ती आणि देशभक्तीचा संगम इथे बघायला मिळत आहे..
Republic Day 2023 : नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय ध्वजारोहण
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण पार पडले. संघाचे नागपूर महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण झाले. यावेळी संघ मुख्यलायाच्या सुरक्षेत असलेले सीआयएसएफ चे जवान, एसआरपीएफ चे जवान व संघाचे इतर पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त आरवली समुद्र किनाऱ्यावर साकारलं मनमोहक वाळूशिल्प
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर वाळूशिल्पकार रविराक चिपकर यांनी वाळूशिल्प साकारलं आहे. हे वाळूशिल्प अवघ्या दोन तासात साकारले आहे. या साकारलेल्या वाळू शिल्पामध्ये रंगसंगती देत अतिशय मनमोहक असे वाळूशिल्प साकारलं आहे.
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिकेवर आकर्षक रोषणाई
Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून देशभर साजरा केला जातो. आजच्या दिवशी देशभरता विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिकेवर (Solapur Municipal Corporation) आकर्षक रोषणाई (illumination) करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन (Indra Bhavan) ही ऐतिहासिक इमारत आहे. या इमारतीवर तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. रंगबेरंगी रोषनाईनं सजलेले पाण्याचे कारंजे लक्ष वेधून घेत आहेत.