पुणे : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज साठ हजारांच्या जवळ कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यात बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील मोठ्या प्रमाणार तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यात पंधरा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असताना जेमतेम सहा हजार इंजेक्शन्स मिळाल्याच प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मात्र मागणीच्या तुलनेत त्यांची संख्या बरीच कमी असल्यानं आज आणि उद्या देखील पुण्यात रेमडीसीव्हरची कमतरता जाणवणार आहे.


पुणे जिल्ह्यासाठी आज दुपारी फक्त पाच हजार नऊशे रेमडीसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा झालाय. हैद्राबादहून रेमडेसिवीरचा हा साठा पुण्याला पोहचलाय. पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी आज पंधरा हजार रेमडेसिवीर  इंजेक्शनची गरज असताना जेमतेम सहा हजार इंजेक्शन्स मिळाल्याच प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. ही रेमडेसिवीर  इंजेक्शन्स थेट हॉस्पिटलमध्ये पुरवली जाणार आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत त्यांची संख्या बरीच कमी असल्यानं आज आणि उद्या देखील पुण्यात रेमडीसीव्हरची कमतरता जाणवणार आहे.


रेमडेसिवीर  इंजेक्शन इथून पुढे केमीस्टकडे वितरणासाठी न देता थेट हॉस्पिटलमध्ये पुरवण्याचा निर्णय सर्वात आधी तीन दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी पुण्यात घेण्यात आला होता.  मात्र हॉस्पिटलमध्ये त्याचा पुरवठा सोमवारी दुपारनंतर आणि तो ही अपुर्या प्रमाणात सुरू झालाय. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून रेमडीसीव्हर इंजेक्शन्स केमीस्टकडे देखील मिळत नाहीत आणि हॉस्पिटलमध्ये देखील ती पोचलेली नाहीत अशी पुण्यात परिस्थिती होती. उद्या पुण्याला रेमडीसीव्हर इंजेक्शन्स मिळतील का आणि मिळाल्यास किती मिळतील हे स्पष्ट नसल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.